– रोहिदास हतागळे, बीड प्रतिनिधी
ADVERTISEMENT
बीड जिल्ह्यातील मांगवडगाव येथील पारधी समाजाच्या व्यक्तींच्या हत्येप्रकरणी अंबाजोगाई जिल्हा आणि सत्र न्यायालयाने आज आपला निकाल दिला आहे. या खटल्यातील पाचही आरोपींना सत्र न्यायाधीश व्ही.के.मांडे यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
सचिन निंबाळकर, हनुमंत निंबाळकर, बाळासाहेब निंबाळकर, राजाभाऊ निंबाळकर आणि जयराम निंबाळकर यांना तिहेरी हत्याकांडात जन्मठेप सुनावण्यात आली आहे.
या घटनेतील मयत व्यक्ती या पारधी समाजाच्या होत्या. मयत पवार कुटुंबाच्या जमिनी या मांगवडगावात होत्या, या जमिनीच्या मालकीवरुन पवार आणि निंबाळकर कुटुंबामध्ये जुना वाद होता. त्या अनुशंगाने मयत बाबु शंकर पवार यांना २००६ साली मारहाण करण्यात आली होती. यानंतर जमिनीच्या वादाचा निकाल कोर्टामध्ये पवार कुटुंबाच्या बाजूने लागला.
यानंतर बाबु पवार हे आपल्या मुलं आणि सुनांसह वादग्रस्त जमिनीवर गेले असता आरोपींनी त्यांच्यावर दगडाने हल्ला करत ट्रॅक्टर अंगावर घातला. आरोपींनी यावेळी पवार कुटुंबाला जबर मारहाणही केली. ज्यात वडील बाबु शंकर पवार आणि त्यांची दोन मुलं संजय आणि प्रकाश यांचा शेतातच मृत्यू झाला. या मारहाणीत प्रकाश यांची पत्नी दादुलीही गंभीर जखमी झाली होती. तसेच या हल्ल्यात पवार कुटुंबातील इतर व्यक्तीही गंभीर जखमी झाल्या होत्या.
यानंतर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल करत न्यायालयात खटला सुरु केला. सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे एकुण सोळा साक्षीदार तपासण्यात आले . त्यात जखमी साक्षीदार , डॉक्टर , पोलीस अधिकारी वगैरे साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. ही साक्ष आणि सरकारी वकीलांचा युक्तीवाद ग्राह्य धरुन न्यायाधीशांनी पाचही आरोपींना जन्मठेप सुनावली.
पुणे: मोबाइल नंबर न दिल्याने तरुणीवर अॅसिड फेकण्याची धमकी
ADVERTISEMENT