ब्रिटनच्या महाराणी क्वीन एलिझाबेथ यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. डॉक्टर त्यांच्या प्रकृतीबाबत चिंतेत आहेत अशी माहिती बकिंगहॅम पॅलेसने दिली आहे. त्यांना वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे. ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांच्या प्रकृतीबाबत डॉक्टर काळजी करत आहेत. सध्या क्वीन एलिझाबेथ यांचं वय ९६ आहे.
ADVERTISEMENT
क्वीन एलिझाबेथ यांची प्रकृती चिंताजनक
ब्रिटनच्या नवनिर्वाचित पंतप्रधान लिज ट्रस यांनीही या बातमीबाबत चिंता व्यक्त केली आहे. बकिंगहॅम पॅलेसने दिलेल्या वृत्तानंतर पूर्ण देश चिंतेत आहे असंही लिज ट्रस यांन म्हटलं आहे. सगळा देश त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करतो आहे. आम्ही सगळे त्यांच्यासोबत आहोत असंही ट्रस यांनी म्हटलं आहे.
क्वीन एलिझाबेथ यांनी मंगळवारी कंझर्व्हेटीव पक्षाच्या नेत्या लिझ ट्रस यांची पंतप्रधान म्हणून नियुक्ती केली. आता बकिंगहॅम पॅलेसने महाराणी एलिझाबेथ यांची प्रकृती खालावली आहे अशी माहिती दिली आहे. तसंच डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांना ठेवण्यात आलं आहे असंही सांगितलं आहे.
१९५२ मध्ये एलिझाबेथ झाल्या क्वीन
१९५२ मध्ये क्वीन एलिझाबेथ यांच्या वडिलांचं निधन झालं. त्यानंतर त्या ब्रिटनच्या महाराणी झाल्या. हे पद अजूनही त्यांच्याकडेच आहे. २ जून २०२२ या दिवशी महाराणी एलिझाबेथ यांच्या कारकिर्दीला ६९ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने बकिंगहॅम पॅलेस या ठिकाणी एलिझाबेथ यांना मानवंदना देण्यात आली. या सोहळ्यासाठी राजवाड्याच्या बाल्कनीत संपूर्ण कुटुंबासह पारंपारिक पोषाखात उपस्थित होत्या. ब्रिटनमध्ये त्याच दिवशी ३ हजार ठिकाणी दीप महोत्सवही आयोजित करण्यात आला होता.
याच वर्षी २० फेब्रुवारी २०२२ ला महाराणी एलिझाबेथ यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांचं दैनंदिन कामकाज सुरू होतं. एलिझाबेथ यांना कोरोनाची लागण झाली असल्यानं त्या करोनासंदर्भातल्या सगळ्या नियमावलीचं पालन करतील असंही फेब्रुवारी महिन्यात बकिंगहॅम पॅलेसने जाहीर केलं होतं. कोरोनातून त्या बऱ्याही झाल्या. आता त्यांची प्रकृती खालावली असल्याने डॉक्टर चिंतेत आहेत.
क्वीन एलिझाबेथ या १९५२ ते २०२२ अशी ७० वर्षे महाराणी हे पद भूषवत आहेत. इतका प्रदीर्घ काळ त्यांनी हे पद भुषवलं आहे ही बाब अत्यंत विशेष आणि महत्त्वाची मानली जाते आहे.
ADVERTISEMENT