– मिथिलेश गुप्ता, डोंबिवली
ADVERTISEMENT
डोंबिवली पूर्वतील टिळक चौकातील आनंद शिला बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या विजया बाविस्कर या 58 वर्षीय महिलेची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली होती. महिला घरी एकटी असताना रात्रीस तिचा गळा दाबून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचा पोलिसांनी अवघ्या 24 तासांच्या आत छडा लावला आहे. पोलिसांनी हत्या करणाऱ्या महिलेला अटक केली असून, सीमा सुरेश खोपडे (40) असं अटक करण्यात आलेल्या महिलेचं नाव आहे.
घटनेप्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात भादंवि कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची गंभीर दखल घेत विजया बाविस्कर या महिलेची हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांच्या शोधण्यासाठी 5 स्वतंत्र पथके रवाना करण्यात आली होती.
१९९६ ला कसं उघडकीस आलं लहान मुलाचं हत्याकांड? गावित बहिणींच्या अटकेनंतर काय काय घडलं?
डोंबिवली विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त जय मोरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय आफळे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि वैभव चुंबळे, सपोनि प्रवीण बाकले, फौजदार अजिंक्य धोंडे, फौजदार ममता मुंजाळ, सपोनि अविनाश वणवे, फौजदार सुनील तारमळे, फौजदार संदीप शिंगटे, फौजदार कुलदीप मोरे यांनी मारेकऱ्यांचा शोध सुरू केला होता.
या पथकांना तांत्रिक विश्लेषण आणि खासगी गुप्तहेरांकडून माहिती मिळवली. झोपडपट्टी भागात कोम्बिंग ऑपरेशन राबवत सीमा सुरेश खोपडे (40) या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतलं. या गुन्ह्यात सहभाग असल्याने पोलिसांनी तिला अटक केली.
धक्कादायक! बारामतीत केसरी टूर्सच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या महिलेवर चाकू हल्ला
हत्येचं कारण आलं समोर…
सीमा खोपडे आणि विजया बाविस्कर या दोघींची जुनी ओळख होती. विजया यांच्या घरी सीमा ही रविवारी रात्री झोपण्याच्या उद्देशाने गेली. तिथे गेल्यानंतर विजया यांच्या अंगावरील दागिने बघून सीमा खोपडेनं गळा दाबून ह्त्या केली. त्यानंतर विजया यांच्या अंगावरील गळ्यातील चैन, कानातील दागिने, अंगठी, हातातील दोन बांगड्या असे सर्व सोन्याचे दागिने चोरी काढून घेतलं. आरोपी महिलेनं या गुन्ह्याची पोलिसांना कबूली दिली.
नागपुर हादरलं! घरात आढळले चौघांचे मृतदेह; पत्नीसह 2 मुलं पडले होते रक्ताच्या थारोळ्यात
या गुन्ह्यात आणखी कुणी आरोपी आहे का? त्याचबरोबर महिलेची हत्या मालमत्तेच्या वादातून झाला आहे का? याबाबत पोलीस तपास करत आहेत.
ADVERTISEMENT