भाजपच्या १२ आमदारांच्या निलंबनात मोलाची भूमिका बजावणाऱ्या भास्कर जाधव यांच्यावर निलंबीत आमदार आशिष शेलार यांनी टीका केली आहे. दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन गाजवल्यानंतर भास्कर जाधव यांनी अध्य़क्षपदाची इच्छा व्यक्त केली होती. परंतू सातऱ्यात पत्रकारांशी बोलत असताना आशिष शेलार यांनी, शिवसेनेने भास्कर जाधवांचा वापर करुन घेतला त्यामुळे आता त्यांना फारकाही मिळेल असं वाटत नाही असं म्हटलंय.
ADVERTISEMENT
“अध्यक्षपद कोणाला द्यायचं हा महाविकास आघाडीचा अंतर्गत प्रश्न आहे. आमचं म्हणणं आहे की त्यांनी आधी निवडणूक घ्यायची हिंमत तरी दाखवावी. भास्कर जाधवांना अध्यक्षपदाची इच्छा झाली असेल तर त्यात काही चूक नाही. त्यांना असं वाटू शकतं. पण शिवसेनेने त्यांचा वापर करुन घेतलाय, तिन्ही पक्षांनी त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवली. भास्कर जाधवांच्या एका निर्णयामुळे त्यांची राज्यभरात प्रतिमा मलिन झाली आहे. त्यामुळे वापर करुन झाल्यानंतर त्यांना फारकाही मिळेल अशी परिस्थिती दिसत नाही.”
Vidhan Sabha अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहील ! भास्कर जाधवांच्या स्वप्नांना शरद पवारांनी लावला सुरुंग
शिवसेनेकडे असलेलं वनमंत्रीपद काँग्रेसला देऊन त्याबदल्यात अध्यक्षपद आपल्याकडे घ्यावं अशी इच्छा भास्कर जाधवांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली. परंतू काँग्रेस आणि राष्ट्रवादीने त्यांच्या या स्वप्नांना ब्रेक लावत अध्यक्षपदाचा उमेदवार हा काँग्रेसचाच असेल असं स्पष्ट केलं. त्यामुळे आगामी हिवाळी अधिवेशनाआधी राज्य सरकार विधानसभेच्या अध्यक्षपदाबद्दल काय निर्णय घेतं याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. नाना पटोलेंच्या राजीनाम्यानंतर अध्यक्षपद रिक्त आहे.
जाधवांच्या मनसुब्यांना Congress चा ब्रेक, आमच्याकडेही अनेक भास्कर जाधव आहेत – थोरातांचा टोला
ADVERTISEMENT