एका 89 वर्षांच्या निवृत्त लष्करी जवानाने त्याची पत्नी आणि अविवाहित मुलीची गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडली आहे. पुरूषोत्तम सिंग गंडहोक असं हत्या करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी मेघवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
पुरुषोत्तम सिंग गंडहोक याने त्याची पत्नी जसबीर कौर गंडहोक आणि मानसिक विकलांग मुलगी कमलजीत कौर यांची गळा चिरून हत्या केली. पुरूषोत्तम यांची पत्नी जसबीर ही मागील दहा वर्षांपासून आजारी होती. तर मुलगी कमलजीतची मानसिक स्थिती ठीक नव्हती. त्यामुळे या दोघींची देखभाल पुरूषोत्तम सिंगलाच करावी लागत असे. या सततच्या देखभालीला कंटाळून या वृद्ध माणसाने हे टोकाचं पाऊल उचललं आहे. मेघवाडी पोलिसांनी या प्रकरणी पुरूषोत्तम सिंग गंडहोकला अटक केली आहे.
वेफर्सचं पाकिट अंगणात फेकल्याच्या रागातून तरूणाने केली वृद्धाची हत्या, अकोल्यातली घटना
पुरूषोत्तम यांच्या पत्नीला गुडघेदुखीचा त्रास होता. त्यामुळे त्यांना चालताना प्रचंड वेदना होत असत. त्या अंथरुणाला खिळून होत्या. तर त्यांची 55 वर्षांची मुलगी गतिमंद असल्याने तिचंही सगळं पुरूषोत्तम यांनाच करावं लागत असे. या दोघींचं आजारपण आणि खस्ता खाऊन कंटाळलो असल्याने आणि दोघींच्या वेदना सहन होत नसल्याने त्यांची हत्या केली अशी कबुली पुरूषोत्तम यांनी दिली आहे.
शेर-ए-पंजाब कॉलनीतील प्रेम संदेश सोसायटीत हे कुटुंब राहात होतं. पुरूषोत्तम यांच्या एका मुलीचं लग्न जालं आहे. जसबीर कौर या गेल्या दहा वर्षांपासून आजारी होत्या. त्यांची अँजिओग्राफीही करण्यात आली आहे. त्या बेडवरच झोपून असल्याने सगळी कामं पुरूषोत्तम यांनाच करावी लागत होती. त्यामुळे त्यांनी हे अत्यंत टोकाचं पाऊल उचललं. पुरूषोत्तम यांनी सोमवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमाराला त्यांच्या विवाहित मुलीला फोन केला. तुझ्या आईची आणि बहिणीची मी हत्या केली आहे असं तिला त्यांनी सांगितलं.
परमबीर सिंगच अँटेलिया आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचे मास्टरमाईंड-अनिल देशमुख
पुरूषोत्तम यांच्या मुलीला ही बाब कळताच तिने तातडीने वडिलांच्या घरी धाव घेतली. फ्लॅट उघडण्यासाठी तिने वडिलांना हाकही मारली. मात्र पोलिसांना घेऊन ये तोपर्यंत मी दरवाजा उघडणार नाही असं पुरूषोत्तम यांनी तिला सांगितलं. यानंतर त्यांची मुलगी वडिलांनी सांगितल्याप्रमाणे पोलिसांना घेऊन आली. त्यांनी दरवाजा उघडला तेव्हा पोलिसांना जसबीर कौर आणि कमलजीत कौर या दोघीही रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या. या दोघी रात्री झोपल्यानंतर आपण त्यांची गळा चिरून हत्या केली अशी माहिती पुरूषोत्तम यांनी सांगितलं.
ADVERTISEMENT