ड्रग्स केसमध्ये आतापर्यंत फसले आहेत ‘हे’ बॉलिवूड स्टार्स

मुंबई तक

• 05:54 PM • 03 Oct 2021

मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझमध्ये सुरु असलेल्या ड्रग पार्टीचा NCB ने पदार्फाश करुन एकच खळबळ उडवून दिली आहे. ड्रग्स पार्टी प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक करण्यात आली आहे. पण ही काही अशी पहिलीच केस नाही. याआधी देखील बॉलिवूडच्या अनेक स्टार्सचं नाव समोर आलं आहे. याआधी अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूनंतर ड्रग्स कनेक्शनप्रकरणी […]

Mumbaitak
follow google news

हे वाचलं का?

मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझमध्ये सुरु असलेल्या ड्रग पार्टीचा NCB ने पदार्फाश करुन एकच खळबळ उडवून दिली आहे.

ड्रग्स पार्टी प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक करण्यात आली आहे. पण ही काही अशी पहिलीच केस नाही. याआधी देखील बॉलिवूडच्या अनेक स्टार्सचं नाव समोर आलं आहे.

याआधी अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूनंतर ड्रग्स कनेक्शनप्रकरणी एनसीबीने अनेक बड्या कलाकारांची चौकशी केली होती.

सुशांतच्या मृत्यूनंतर एनसीबीने ड्रग्स प्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिच्या भावाला अटक केली होती. या दोघांनाही अनेक दिवस तुरुंगात काढावे लागले होते. सध्या ते दोघेही जामीनावर बाहेर आहेत.

अभिनेत्री सारा अली खान हीचं नाव देखील ड्रग्स अँगलमध्ये पुढे आलं होतं. पण एनसीबीच्या चौकशीत साराने ड्रग्स घेत नसल्याचं सांगत सगळ्या गोष्टी फेटाळून लावल्या होत्या.

अभिनेत्री श्रद्धा कपूर ही देखील व्हॉट्सअॅप चॅटमुळे एनसीबीच्या रडारवर होती.

श्रद्धाच्या चॅटवरुन असं समोर आलं होतं की, CBD Oil चं सेवन करायची.

NCB च्या चौकशीत श्रद्धाने सांगितलं होतं की, ती CBD Oil चं सेवन हे एक्सटर्नल यूजसाठी करायची.

अभिनेत्री दीपिका पदुकोण हिला देखील ड्रग्स प्रकरणी एनसीबीच्या चौकशीला सामोरं जावं लागलं होतं.

अभिनेता अर्जुन रामपाल देखील ड्रग्स प्रकरणात अडकला होता. त्याच्या घरी एनसीबीने छापेमारी देखील केली होती.

अभिनेत्री रकुल प्रीत हीचं नाव देखील दाक्षिणात्य सिने इंडस्ट्रीतील एका मोठ्या स्टारसोबत ड्रग्स प्रकरणात समोर आलं होतं.

कॉमेडियन भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांच्यावर देखील ड्रग्स प्रकरणात कारवाई करण्यात आली होती. हे दोघेही सध्या जामिनावर बाहेर आहेत

    follow whatsapp