महाराष्ट्रात कोरोना रूग्णांची संख्या वाढली आहे. 1 ते 7 जानेवारी या कालावधीत रूग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. रात्री 11 ते सकाळी 5 या कालावधीत कर्फ्यू लावण्यात आला आहे. आणखी काय काय गाईडलाईन्स सरकारने दिल्या आहेत जाणून घेऊ. 10 जानेवारीपासून या निर्बंधांची अंमलबजावणी केली जाणार आहे.
ADVERTISEMENT
वाढत्या कोरोना संकटामुळे फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशभरातल्या ‘या’ राज्यांमध्येही शाळा बंद
पहाटे 5 ते रात्री 11 पर्यंत पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना एकत्र फिरता येणार नाही
रात्री 11 ते पहाटे 5 या वेळेत अत्यावश्यक सेवा वगळता कुणालाही प्रवास करता येणार नाही
लग्न समारंभासाठी जास्तीत जास्त 50 व्यक्तींना उपस्थिती
अंत्यविधीसाठी जास्तीत जास्त 20 लोकांना उपस्थित राहता येणार
शाळा आणि महाविद्यालयं 15 फेब्रुवारीपर्यंत बंद
थिएटर्स, नाट्यगृहं 50 टक्के उपस्थितीची मुभा
सलून आणि खासगी कार्यालयं 50 टक्के उपस्थितीत सुरू ठेवण्याची मुभा
खासगी कार्यालयांनी वर्क फ्रॉम होम सुरू करण्यात यावं
पूर्ण लसीकरण झालेल्या सार्वजिनक बसने वाहतूक करण्यास मुभा
हॉटेल, रेस्तराँ रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा
स्विमिंग पूल, स्पा, व्यायामशाळ पूर्णतः बंद
महाराष्ट्रात प्रवेश करायचा असल्यास कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतल्याचं प्रमाणपत्र किंवा आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट दाखवणं बंधनकारक
हॉटेल्स रेस्तराँमध्ये लसीकरण पूर्ण झालेल्यांनाच प्रवेश, होम डिलिव्हरी सेवा पूर्णवेळ सुरू राहणार
24 तास सुरू राहणारे कार्यालयातील कर्मचारी अत्यावश्यक सेवेत मोडली जाणार
दुकानं, हॉटेल्स रेस्तराँमध्ये काम करणाऱ्यांनी कोरोना प्रतिबंधक लसी घेतलेल्या असणं बंधनकारक
लसीचे दोन डोस न झालेल्या व्यक्ती काम करताना आढळल्यास संबंधित हॉटेल, दुकान किंवा रेस्तराँवर कारवाई केली जाणार
जगभरात ओमिक्रॉन बाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत असताना भारतात देखील ओमिक्रॉन बाधितांची संख्या तीन हजारांच्या वर गेली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी नवी नियमावली जारी केली आहे. या नियमावलीनुसार परदेशातून, विशेषत: ओमिक्रॉनचा धोका असलेल्या देशांच्या यादीत समाविष्ट देशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांच्याहोम क्वारंटाईनच्या नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे. तसेच, त्यांचे करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह आल्यास पुढील कार्यवाहीच्या पद्धतीमध्ये देखील बदल करण्यात आला आहे. केंद्र सरकारने यासंदर्भात नियमावली जारी केली आहे.
ADVERTISEMENT