ADVERTISEMENT
30 वर्षीय अमांडा ही 55 वर्षांच्या ऐस याच्या मुलाची आई होणार आहे.
2017 मध्ये त्यांची पहिल्यांदा भेट झाली होती. ऐसने 2020 मध्ये तिला मागणी घातली होती. त्यानंतर त्यांनी 2021 मध्ये लग्न केलं.
2017 च्या एप्रिलमध्ये कॉलेजमधील बॉयफ्रेंडसोबत तिचं लग्न होणार होतं. अमांडाने शेवटच्या क्षणी ब्रेकअप केलं होतं.
ब्रेकअप झाल्यानंतर काही काळ ती एकटीच होती, पण नंतर ती 55 वर्षीय पुरुषाच्या प्रेमात पडली
अमांडा पहिल्या नजरेतच ऐसच्या प्रेमात पडली, दोघेही एकमेकांकडे आकर्षित झाले.
ऐसचा त्याच वेळी घटस्फोट झाला होता. ऐसला पुन्हा लग्न करायचे नव्हते पण अमांडाची भेट झाली अन् त्यांच्यात प्रेम फुलत गेलं.
लोक अमांडा आणि ऐसला अनेकदा वडील आणि मुलगीच समजतात. ट्रोल्स अश्लील कमेंट करतात, पण ते आपल्या नात्यात आनंदी आहेत.
अमांडाला पहिल्यांदा भेटल्यावर ऐस म्हणाला – मी एकटा बसून फिश टॅको खात होता, मग ती आली आणि स्वतःची ओळख करून दिली.
दोघांनी फोन नंबरची देवाणघेवाण केली आणि डेटिंग सुरू झालं.
अमांडाच्या सौंदर्याने ऐस आकर्षित झाला होता. आता वयाच्या ५५व्या वर्षी तो पुन्हा एकदा वडील होणार आहेत. अमांडा जूनमध्ये मुलाला जन्म देणार आहे.
ADVERTISEMENT