ADVERTISEMENT
साताऱ्यात काल (11 मार्च) संध्याकाळी गौतमी पाटीच्या कार्यक्रमने नादचं केला.
पण, या कार्यक्रमाच्या आयोजनाचं निमित्त काही वेगळंच होतं. जे ऐकून सर्वांनाच धक्का बसला.
साताऱ्यातील एका शेतकऱ्याने चक्क आपल्या बैलाच्या वाढदिवसाला गौतमी पाटीलच्या लावणी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं.
यावेळी साताऱ्यात गौतमी पाटीलचा पुन्हा एकदा जलवा पाहायला मिळाला.
जावळी तालुक्यातील खर्शी येथे प्रसिद्ध बैलगाडा मालक पैलवान सतीश भोसले यांच्या महाराष्ट्र चॅम्पियन अश्विन या बैलाचा हा वाढदिवस होता.
चक्क बैलाच्या वाढदिवसाला गौतमी पाटीलच्या लावणीचा तडका हे ऐकून चांगलीच चर्चा रंगू लागली आहे.
काही दिवसांपूर्वी साताऱ्यातच एका पाच वर्षांच्या मुलाच्या वाढदिवसालाही गौतमी पाटीलचा कार्यक्रम पार पडला होता.
ADVERTISEMENT