‘नव्याने पक्ष बांधा अन्…’; गुलाबराव पाटलांचं आदित्य ठाकरेंना चॅलेंज

मुंबई तक

• 04:03 AM • 23 Feb 2023

Gulabrao patil challenge to Aaditya Thackeray after Election Commission Order : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर एकनाथ शिंदे समर्थक नेते ठाकरे गटाला डिवचताना दिसत आहेत. शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालावर भाष्य करताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार आदित्य ठाकरेंना चॅलेंज दिलं आहे. गुलाबराव […]

Mumbaitak
follow google news

Gulabrao patil challenge to Aaditya Thackeray after Election Commission Order : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर एकनाथ शिंदे समर्थक नेते ठाकरे गटाला डिवचताना दिसत आहेत. शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालावर भाष्य करताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार आदित्य ठाकरेंना चॅलेंज दिलं आहे. गुलाबराव पाटलांनी खासदार संजय राऊतांवरही निशाणा साधला आहे.

हे वाचलं का?

जळगाव येथे माध्यमांशी गुलाबराव पाटील यांनी संवाद साधला. आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालानंतर टीका केली होती. त्यावर बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, “पिक्चर लागून सात महिने झाले आहेत. त्यामुळे आता कोणत्याही आरोपाला महत्त्व राहत नाही. तुम्हाला काय मिळालं व कोणी काय गद्दारी केली? हे आता सगळं संपलं आहे. नव्याने पक्षाची उभारणी करा. पक्ष बांधा आणि आम्हाला पाडण्याचा प्रयत्न करा,” असं चॅलेंज गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरेंना दिलं.

निवडणूक आयोगाच्या निकालाबद्दल गुलाबराव पाटील काय म्हणाले?

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला दिलं. निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर ठाकरे गटाकडून टीका केली जात आहे. आयोगाच्या निर्णयाला ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं आहे. सुप्रीम कोर्टाने आयोगाच्या निर्णयाला लगेच स्थगिती देण्याची मागणी फेटाळली. त्यावर दोन आठवड्यांनी सुनावणी घेऊन निर्णय देऊ असं कोर्टाने म्हटलेलं आहे.

Maharashtra Political Crisis: 3 दिवस खल झाला, पण… शिंदे-ठाकरेंना कोर्टाने दिली पुढची तारीख

यावर गुलाबराव पाटील म्हणाले, “मागच्या काळातील दाखले देऊनच हायकोर्टाने ठाकरे गटाची शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह बाबतची याचिका फेटाळून लावली आहे. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाचे मुलायम सिंग यादव यांच्या मुलाला सायकल चिन्ह मिळालं होतं, तीच पुनरावृत्ती कोर्टाने या ठिकाणी केली,” असं पाटील म्हणाले.

संजय राऊत दात काढलेला वाघ आहे का?

खासदार संजय राऊत यांनी श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. श्रीकांत शिंदेंनी ठाण्यातील गुंडांना सुपारी दिल्याचं राऊतांचं म्हणणं आहे. राऊतांच्या या आरोपाबद्दल बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, “स्वतःला वाघ म्हणवणारे धमकीला काय घाबरताय?, संजय राऊत सातत्याने मी वाघ आहे, मी वाघ आहे सांगतात तर दात ते काढलेला वाघ आहे का? अशी खोचक टीका गुलाबराव पाटलांनी संजय राऊतांवर केली.

    follow whatsapp