ADVERTISEMENT
सामान्यतः माणसाच्या अंगा-खांद्याशी खेळणारे कुत्रे काहीवेळेस गाडी दिसल्यावर आक्रमक झालेले दिसतात.
अनेकदा कुत्रे दुचाकीच्या मागे किंवा चालत्या वाहनांच्या मागे धावताना आपण पाहतो.
चालत्या वाहनांचा किंवा दुचाकीचा पाठलाग करण्यामागे अनेक कारणं असू शकतात.
कुत्रे असं करून त्यांच्या राहण्याच्या जागेला त्यांचा विभाग म्हणून चिन्हांकित करतात.
यादरम्यान कुत्रे या परिसरात वाहनांवर किंवा इतर ठिकाणी लघवी करून परिसरावर आपलं वर्चस्व दाखवतात.
तसंच, एखाद्या कारमधून दुसऱ्या भागातील कुत्र्याच्या वास आल्यास कुत्रे असं करतात.
याचे आणखी एक कारण कुत्र्यांच्या स्वभावाशी संबंधित आहे. त्यांच्या दिशेने भरधाव वेगाने येणारे वाहन म्हणजे त्यांच्या शिकारीचा पाठलाग करण्याची वृत्ती जागृत करते.
याशिवाय कुत्रे आवाजासाठी अत्यंत संवेदनशील असतात. वाहनांमधून येणारा आवाज त्यांना भडकावतो.
रात्रीच्या वेळी कुत्र्यांच्या या कृती अनेकदा दिसतील कारण ते रात्री सक्रिय असतात आणि वेगवान वाहनांचा आवाज तीव्र होतो.
ADVERTISEMENT