ADVERTISEMENT
एक कपल लग्नापूर्वीच हनिमूनला तैवानहून जपानला गेलं होतं.
यावेळी मुलीने बराच वेळ शॉपिंग केली. यामुळे तिचा बॉयफ्रेंड नाराज झाला आणि रागात तिला तिथेच सोडून निघून गेला.
मुलीला जपानची भाषाही येत नव्हती. कसं बोलावं काहीच कळत नव्हतं. त्यातच बर्फवृष्टीही सुरू झाली.
ती म्हणाली, ‘ती एका दुकानाच्या छताखाली तिच्या बॉयफ्रेंडची वाट पाहत उभी होती, बर्फ पडत होता आणि अंधार झाला होता. पण तो आला नाही.’
तैवानमधील एका मुलीने तिची मदत केली. हॉटेलमधून कॅब बुक केली आणि तिथे गेल्यानंतर तिचा बॉयफ्रेंडशी संपर्क झाला.
नंतर, बॉयफ्रेंडने माफी मागितली पण, दुसऱ्या दिवशी तो काही घडलं नसल्यासारखं वागला. त्यामुळेच ती लग्न मोडण्याचा विचार करत आहे.
या घटनेची माहिती मुलीने सोशल मीडियावर शेअर केली आहे. तिची ही पोस्टही चांगलीच व्हायरल झाली आहे.
लग्न मोडण्याचा निर्णय घेण्यास उशीर झाला की काय, याची भीती वाटत असल्याचं ती म्हणते.
लोकांनी या पोस्टवर खूप कमेंट्स केल्या आहेत. काहींनी तिला ब्रेकअप करण्याचा सल्ला दिला आहे.
एका यूजरने म्हटलंय, “हा माणूस भयंकर आहे. ब्रेकअप कर. असे लोक धोकादायक असतात.”
ADVERTISEMENT