Mahayuti : एकनाथ शिंदेंच्या 20 आमदारांची Y सुरक्षा काढली, महायुतीमधील धुसफूस आणखी वाढणार?

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर बहुतेक आमदारांना ही सुरक्षा देण्यात आली होती. ही सुरक्षा काढल्यानंतर शिवसेना आमदार थेट नाराजी व्यक्त करणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

Mumbai Tak

ऋत्विक भालेकर

18 Feb 2025 (अपडेटेड: 18 Feb 2025, 11:51 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

एकनाथ शिंदेंच्या 20 आमदारांची सुरक्षा काढली

point

गृह विभागाचा मोठा निर्णय

point

एकनाथ शिंदें यांच्या आमदारांमध्ये नाराजी वाढणार?

सरकारने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या 20 आमदारांची वाय सुरक्षा काढून घेतली असून, यामुळे चर्चा सुरू झाल्या आहेत. राज्याच्या संसाधनांचा गैरवापर रोखण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या पुढाकाराचा एक भाग म्हणून या पावलाकडे पाहिलं जातंय. या आमदारांना मंत्री नसतानाही अतिरिक्त सुरक्षा म्हणून Y सुरक्षा कवच देण्यात आलं होतं.

हे वाचलं का?

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर बहुतेक आमदारांना ही सुरक्षा देण्यात आली होती. यासोबतच भाजपच्या अनेक आमदारांची आणि अजित पवार गटातील आमदारांची सुरक्षाही कमी करण्यात आली आहे.
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे शिंदेंची शिवसेना आणि भाजपमध्ये् सुरू असलेली धुसफूस आणखी वाढण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली सत्ता टिकवून ठेवण्यासाठी उचललेलं हे धोरणात्मक पाऊल म्हणून पाहिलं जाऊ शकतं. पण त्यामुळे आता शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार नाराज होण्याची शक्यता वर्तवली जातेय. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी राज्य सरकारने घेतलेल्या काही निर्णयांचा संदर्भ देत महायुतीचा व्हलेंटाईन सुरू नसल्याचा टोला मारलाय.

हे ही वाचा >>Santosh Deshmukh Case : "रात्री कुणी झोपत नाही, जेवण वेळेवर नाही, सावरणं खूप अवघड आहे ताई..."

सत्ताधारी महायुतीमध्ये धुसफूस असल्याच्या चर्चा सुरू आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक वैद्यकीय सहाय्यता कक्ष स्थापन केला असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्याच कार्यालयाशेजारीच एक वैद्यकीय सहाय्य कक्ष सुरू ठेवला आहे. त्यामुळे मंत्रालयाच्या इमारतीमध्ये असणारा सातवा मजला (राज्य सचिवालय) सत्तासंघर्षाचं प्रतीक बनल्याचं म्हटलं जातंय. सातव्या मजल्यावर राज्यात प्रमुख प्रकल्पांवर आणि महत्त्वाच्या बैठकांवर लक्ष ठेवण्यासाठी फडणवीसांची वॉर रूमही आहे आणि तिथेच राज्यातल्या प्रमुख प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी समन्वय समिती कक्ष स्थापन केला आहे.


हे ही वाचा >>Supriya Sule : "संतोष देशमुखांच्या कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत हा लढा सुप्रिया सुळे लढणार, माझा शब्द"

दरम्यान, या घडामोडींबद्दल विचारले असता, फडणवीस यांनी या मुद्द्याला महत्व नसल्याचं म्हणत, या व्यवस्थेत काहीही चूक नाही. तसंच सरकार चांगलं काम करतंय असं म्हटलं.


 

    follow whatsapp