राज्याचे नगरविकास तथा सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) मंत्री तथा शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. शिंदे याचं नाव चर्चेत येण्याचं कारण आहे मुख्यमंत्री पद. शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शिंदे समर्थक शिवसैनिकांनी अभिष्टचिंतनाचे बॅनर लावले. याचं बॅनर्सवरती भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला आहे. याची आता राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.
ADVERTISEMENT
शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांचा ९ फेब्रुवारी रोजी वाढदिवस आहे. शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसैनिकांकडून त्यांना शुभेच्छा देणारे. अभिष्टचिंतन करणारे बॅनर आणि पोस्टर ठाणे परिसरात लावण्यात आलं आहेत. ठाण्यातील वागळे इस्टेटमधील चेकनाका परिसरात लावण्यात आलेल्या बॅनरवरती एकनाथ शिंदे यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री, असा करण्यात आला आहे.
‘असं बिलकुल चालणार नाही!’ खड्डे पडलेल्या रस्त्यावरच एकनाथ शिंदेनी अधिकाऱ्यांची घेतली शाळा
शिवसैनिकांकडून अशा प्रकारचे बॅनर लावण्यात आल्यामुळे मुख्यमंत्रीपद आणि एकनाथ शिंदे चर्चा सुरू झाली आहे. मात्र, मुख्यमंत्रीपदावरून एकनाथ शिंदे यांचं नाव चर्चेच्या केंद्रस्थानी येण्याची ही पहिलीच वेळ नाही.
राज्यात महाविकास आघाडीच्या सत्ता स्थापनेची प्रक्रिया सुरू असतानाच मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे यांचं नाव आघाडीवर असल्याचं बोललं गेलं होतं. मात्र, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली. त्यावेळी एकनाथ शिंदे यांचे बॅनर लागले होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्याच्या काळात एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची सूत्रं सोपण्यात येणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र, हे वृत्त फेटाळत एकनाथ शिंदे यांनी हा खोडसाळपणा असल्याचं म्हटलं होतं.
‘मुख्यमंत्रीपदाचा तात्पुरता कार्यभार एकनाथ शिंदेंकडे सोपवण्यात आल्याचं वृत्त खोटं आणि खोडसाळ’
एकनाथ शिंदे हे शिवसेनेतील महत्त्वाचे नेते आहेत. सध्या ते कॅबिनेट मंत्री असून, पक्षात त्यांना महत्त्वाचं स्थान आहे. शिवसेनेत महत्त्वाची पदे भूषवण्याबरोबरच एकनाथ शिंदे विरोधी पक्षनेते पदही काम केलेलं आहे.
ADVERTISEMENT