मुंबई: राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा आघाडी सरकारमधील बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचं एक वक्तव्य सध्या खूपच चर्चेत आहे. या वक्तव्याने त्यांनी एकनाथ शिंदे यांची कोंडी करुन ठेवली आहे. देवेंद्र फडणवीस यांचं सरकार असताना २०१४ मध्ये युती सरकारच्या काळातच शिवसेनेनं काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत युती करण्याचा प्रस्ताव दिला होता, असा गौप्यस्फोट अशोक चव्हाण यांनी केला आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडाच्या पार्श्वभूमिवर लोकसत्ताशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
ADVERTISEMENT
अशोक चव्हाण नेमकं काय म्हणाले?
२०१४ पासून शिवसेना-भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु झाले होते. त्यानंतर पुन्हा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात राज्यात युतीचं सरकार स्थापन झालं. परंतु २०१४ मध्ये ज्यावेळी भाजप-शिवसेनेमध्ये वाद सुरु होते, त्यावेळीच शिवसेनेनं काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत युती करण्याचा प्रस्ताव दिला होता. आणि त्या शिष्टमंडळात एकनाथ शिंदे यांचा समावेश होता असं वक्तव्य अशोक चव्हाण यांनी केलं आहे.
त्यावेळी चव्हाणांनी या प्रस्तावाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करण्यास सुचवलं होतं. त्यांची संमती असेल तर आमच्या पक्षातर्फे तुमच्या प्रस्तावाचा विचार करू, असं अशोक चव्हाण म्हणाले. त्यावेळी माझ्या चर्चगेट येथील कार्यालयात शिवसेनेचं शिष्टमंडळ भेटलं असल्याचंही चव्हाण म्हणाले. २०१९ मध्ये भाजप-शिवसेनेनं निवडणुका युतीमध्ये लढवल्या परंतु मुख्यमंत्रीपदाच्या शब्दावरुन शिवसेनेनं भाजपसोबत युती तोडली आणि काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन केलं.
अशोक चव्हाणांच्या वक्तव्यावर गुलाबराव पाटीला काय म्हणाले?
अशोक चव्हाणांच्या या वक्तव्यावर चर्चा सुरु असताना शिंदे गटातील मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अशोक चव्हाण यांच्या बोलण्यात काहीच अर्थ नाही. एकनाथ शिंदे गेलेही असतील. पण पक्षाचे नेते सांगतात तेव्हा जावं लागतं. आणि शिवसेनेसोबत जा, असं सोनिया गांधींनी अशोक चव्हाणांना सांगितल्यावर त्यांनाही जावं लागलं, असं सांगत मंत्री गुलाबराव पाटील यांनी चव्हाणांच्या दाव्याला अर्थहिन ठरवलं आहे.
शिवसेना खासदार विनायक राऊत काय म्हणाले?
भाजपच्या त्रासाला कंटाळून सर्वप्रथम कोणी आवाज उठवला होता तर ते एकनाथ शिंदे होते. कल्याण महापालिकेच्या जाहीर प्रचार सभेत एकनाथ शिंदेंनी भाजपसोबत राहायचं नाही म्हणून आपला राजीनामा दिला होता. अशोक चव्हाण म्हणाले ते खरं आहे कारण भाजपला त्रासाला कंटाळून पहिला आवाज मुख्यमंत्र्यांनीच उठवला होता. शिष्टमंडळ घेऊन गेले का नाही याबाबत मला काही माहित नाहीये असं विनायक राऊत म्हणाले आहेत.
ADVERTISEMENT