‘हा एकनाथ शिंदे सकाळी ६ पर्यंत लोकांची कामं करतो’; सुप्रिया सुळेंच्या विधानावरून शिंदेंचा घणाघात

मुंबई तक

12 Sep 2022 (अपडेटेड: 02 Mar 2023, 10:47 AM)

सतत सोबत असणाऱ्या कॅमेरामनवरून विरोधी पक्षनेते अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना चिमटा काढला. तर खासदार सुप्रिया सुळेंनी महाराष्ट्राला दोन मुख्यमंत्री पाहिजे म्हणत शिंदेंना थेट डिवचलं. या विधानांवर एकनाथ शिंदे काय म्हणणार याकडे सगळ्यांचंच लक्ष होतं. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पैठणमध्ये झालेल्या सभेत मौन सोडलं. शिंदेंनी अजित पवारांबरोबरच सुप्रिया सुळेंवरही शाब्दिक वार केला. एकनाथ शिंदे म्हणाले, […]

Mumbaitak
follow google news

सतत सोबत असणाऱ्या कॅमेरामनवरून विरोधी पक्षनेते अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना चिमटा काढला. तर खासदार सुप्रिया सुळेंनी महाराष्ट्राला दोन मुख्यमंत्री पाहिजे म्हणत शिंदेंना थेट डिवचलं. या विधानांवर एकनाथ शिंदे काय म्हणणार याकडे सगळ्यांचंच लक्ष होतं. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पैठणमध्ये झालेल्या सभेत मौन सोडलं. शिंदेंनी अजित पवारांबरोबरच सुप्रिया सुळेंवरही शाब्दिक वार केला.

हे वाचलं का?

एकनाथ शिंदे म्हणाले, “मी मुख्यमंत्री झाल्यानंतर राज्यातील प्रत्येकाला असं वाटतं की ते स्वतः मुख्यमंत्री झाले आहेत. त्यामुळे फोटो काढायला येतात. आता काही लोकांच्या आजूबाजूलाही लोक फिरकत नाहीत. त्याला आपण काय करणार आहे? काही लोक म्हणतात की, दोन मुख्यमंत्री पाहिजेत. काही जण सांगतात, फोटोग्राफर घेऊन जातात. मला कधीच सवय नाहीये. मी कधीच असं केलेलं नाही. जिथे कॅमेरे घेऊन जाता येतात, अशाच ठिकाणी आम्ही जातो. बाकी लोक कुठे जातात मला माहिती नाही. त्यामुळे त्यांचं त्यांना माहितीये”, असं म्हणत एकनाथ शिंदेंनी सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर दिलं.

गणपती दर्शनावरून सुप्रिया सुळेंनी केलेल्या टीकेवर शिंदे म्हणाले…

“काही लोक म्हणतात की, मुख्यमंत्री घरच्या गाठीभेटी घेत आहेत. घरच्या म्हणजे काय ती माझी माणसं आहेत. मला प्रेमाने बोलवतात. मी कालपर्यंत त्यांच्याकडे जात होतो. मुख्यमंत्री झाल्यावर गेलो नाही, तर ते म्हणतील की, मुख्यमंत्री झाल्यावर बदलला. माझ्यात कधीही बदल होणार नाही. माझ्यातला कार्यकर्ता मी मरू देणार नाही”, असं उत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं.

Eknath Shinde:”कसं काय पाटील बरं आहे का? दिल्लीत काय घडलं ते खरं आहे का?”

“काही लोक म्हणताहेत की मंत्री एक किलोमीटरच्या आत दौरे करताहेत. अजितदादा सकाळी ६ वाजता उठून काम करायचे, असंही काही लोक म्हणाले. आधी अजितदादा टीका करत होते. आता ताईही (सुप्रिया सुळे) सुरू झाल्या आहेत. टीका करणं त्यांचं काम आहे. विकास कामं करणं आमचं काम. त्यामुळे काम करत राहू आणि कामातून उत्तर देऊ.”

पैठणच्या सभेत पैसे देऊन गर्दी केली?; एकनाथ शिंदेंचा नाथांच्या नगरीतून उद्धव ठाकरेंवर पलट’वार’

“एकनाथ शिंदे सकाळी ६ वाजेपर्यंत लोकांची कामं करतो”

“ताई (सुप्रिया सुळे) म्हणाल्या की, अजितदादा सकाळी ६ वाजता उठून कामाला सुरूवात करतात. चांगली गोष्ट आहे. पण, ताईंना (सुप्रिया सुळे) मी माहिती देतो की, हा एकनाथ शिंदे सकाळी ६ वाजेपर्यंत लोकांचं काम करतो. हे काम मी महाराष्ट्रासाठी करत राहणार. त्यांना पूर्वीची सवय आहे. कोण मुख्य आणि कोण चालवणारं होतं. त्यामुळे तो रिमोट कंट्रोल काढून घेतल्यामुळे सगळा प्रॉब्लेम झाला आहे”, असं म्हणत शिंदेंनी सुप्रिया सुळे यांच्यावर पलटवार केला.

    follow whatsapp