महाराष्ट्र सदनातून एकनाथ शिंदे 20 मिनिटासाठी अचानक झाले गायब, चर्चांना उधाण

मुंबई तक

• 03:53 AM • 22 Sep 2022

नवी दिल्ली: शिवसेनेच्या मुंबईतील गटप्रमुखांचा मेळावा काल गोरेगाव येथे पार पडला. त्यामध्ये उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे गट, भाजप, अमित शाह, राज ठाकरेंवरती टीकास्त्र डागलं. उद्धव ठाकरेंचं मुंबईतील भाषण संपताच दिल्लीमध्ये हालचालींना वेग आला. काल राज्याचे मुख्यमंत्री दिल्लीमध्ये होते, २१ राज्यातील अध्यक्षांचा छोटेखानी मेळावा काल एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात पार पडला. हा मेळावा सुरु असतानाच एकनाथ शिंदे […]

Mumbaitak
follow google news

नवी दिल्ली: शिवसेनेच्या मुंबईतील गटप्रमुखांचा मेळावा काल गोरेगाव येथे पार पडला. त्यामध्ये उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे गट, भाजप, अमित शाह, राज ठाकरेंवरती टीकास्त्र डागलं. उद्धव ठाकरेंचं मुंबईतील भाषण संपताच दिल्लीमध्ये हालचालींना वेग आला. काल राज्याचे मुख्यमंत्री दिल्लीमध्ये होते, २१ राज्यातील अध्यक्षांचा छोटेखानी मेळावा काल एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात पार पडला.

हे वाचलं का?

हा मेळावा सुरु असतानाच एकनाथ शिंदे अचानक महाराष्ट्र सदन बाहेर पडले, त्यानंतर ते तब्बल २० मिनीटं महाराष्ट्र सदनात नव्हते. त्यामुळे उलट-सुलट चर्चांना उधान आले. एकनाथ शिंदेंनी या २० मिनीटामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट घेतल्याची चर्चा आहे. या भेटीबाबत एकनाथ शिंदे किंवा भाजपने कोणतीच अधिकृत वाच्यता केलेली नाहीये. परंतु राजकीय वर्तुळात या भेटीची चर्चा रंगली आहे.

अमित शाह आणि एकनाथ शिंदेंच्या भेटीमध्ये नक्की काय झालं?

अमित शाह आणि एकनाथ शिंदेंच्या भेटीमध्ये नक्की काय चर्चा याची माहिती अजून समोर आलेली नाही. येत्या २७ सप्टेंबरला सुप्रीम कोर्टात महाराष्ट्राच्या सत्ताकारणाची महत्त्वाची सुनावणी होणार आहे, यावेळेस महत्त्वाचा निकाल येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात झालेला सत्तापालट, शिवसेनेचं चिन्ह तसंच अनेक याचिकांवरती न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेच्या या भेटीला महत्त्व प्रात्प झालं आहे. खरं तर एकनाथ शिंदे काल रात्री उशीरा मुंबईमध्ये येणार होते मात्र त्यांनी आपला मुक्काम दिल्लीतच करायचं ठरवलं.

उद्धव ठाकरेंच्या खासदाराकडून एकनाथ शिंदेंचं कौतुक; ‘राष्ट्रवादी’सोबत युती न करण्याची मागणी

उद्धव ठाकरेंनी अमित शाहांना दिलं थेट आव्हान

शिवसेना संपवण्यासाठी सगळे एकमेकांच्या साथीने उभे राहिले आहेत. भाजपने मुन्नाभाईलाही सोबत घेतलं आहे. या उद्धव ठाकरेंच्या विरोधात मोदी, शाह, भाजप आमचे गद्दार आणि मुन्नाभाई सगळे एकत्र आले आहेत. याचं कारण एकच आहे यांना शिवसेना आणि उद्धव ठाकरे तसंच ठाकरे घराणं संपवायचं आहे. मुंबईचा लचका यांना तोडायचा आहे. पण आज माझं या मैदानावरून अमित शाह यांना आव्हान आहे हिंमत असेल तर पुढच्या महिन्याभरात मुंबई महापालिका आणि विधानसभेची निवडणूक घेऊन दाखवा असं म्हणत उद्धव ठाकरे कालच्या मेळाव्याच्या भाषणात म्हणाले आहेत.

उद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन भाजपचा पलटवार

मुंबई भाजपचे अध्यक्ष तथा भाजप आमदार आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवरती पलटवार केला आहे. “26 जुलैच्या पुरात मुंबईकरच मुंबईकरांसाठी झटत होते, हे खरे आहे. पण आज त्या दाहक आठवणींचे भाषण करणारे 26 जुलैच्या पुरात आपल्या वडिलांना मातोश्रीत सोडून स्वत: पंचतारांकित हॉटेलमध्ये जाऊन बसले होते…त्याचे काय?”, 26/11 च्या हल्ल्यात पण मुंबईकर मुंबईकरांसाठी जातपात, पक्ष न बघता मदत करत होते. नरिमन हाऊस, ताज या परिसरात आमचा कमलाकर दळवीसुद्धा मदत करत होता. आज भाषण करणारे मातोश्रीच्या बाहेर आले होते का?”, असे प्रश्न आशिष शेलार यांनी ट्विटरच्या माध्यमातून विचारले आहेत.

    follow whatsapp