ECI Press Conference : ईव्हीएम मशिन हॅक होऊ शकतं? 6 वाजेनंतर मतदान कसं वाढतं? निवडणूक आयोगाने दिली सर्व प्रश्नांची उत्तरं

EVM हॅक करता येत नाही हे न्यायालयानेही मान्य केले आहे, असेही ते म्हणाले. कोणताही व्हायरस ईव्हीएममध्ये प्रवेश करू शकत नाही. अशा स्थितीत हकीम लुकमान यांच्याकडेही संशयाचे समाधान नाही.

Mumbai Tak

मुंबई तक

• 12:02 PM • 08 Jan 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

"EVM हॅक होत नाही, हे न्यायालयानेही मान्य केलंय"

point

"मतदारांची संख्या 1 अब्जपर्यंत पोहोचणार"

point

मुख्य निवडणूय आयुक्त काय म्हणाले? वाचा सविस्तर

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेतलीय. यावेळी दिल्ली विधानसभा निवडणुकांची घोषणा करण्यात आली असून, 5 फेब्रुवारी 2025 ला दिल्ली मध्ये 70 जागांवर मतदान पार पडणार असून, 8 फेब्रुवारीला मतदान पार पडणार आहे.मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी या पत्रकार परिषदेत निवडणूक प्रक्रिया आणि EVM बद्दलच्या इतर प्रश्नांनाही उत्तर दिली. 

हे वाचलं का?

ईव्हीएम हॅक करता येत नाही हे न्यायालयानेही मान्य केले आहे, असेही ते म्हणाले. कोणताही व्हायरस ईव्हीएममध्ये प्रवेश करू शकत नाही. अशा स्थितीत हकीम लुकमान यांच्याकडेही संशयाचे समाधान नाही.


EVM मध्ये छेडछाड करता होऊ शकते? 

राजीव कुमार म्हणाले की, निवडणुकीच्या सात ते आठ दिवस आधी ईव्हीएम तयार असतात. एजंटसमोर ईव्हीएम सील केले जाते. मतदानानंतर ईव्हीएम सील केले जातात. त्यामुळे ईव्हीएम छेडछाडीच्या चर्चेत तथ्य नाही. ईव्हीएम हॅक करता येत नाही हे न्यायालयानेही मान्य केलं आहे. EVM मध्ये अवैध मतदान होण्याची शक्यता नाही. ईव्हीएमवरील सर्व प्रक्रिया पारदर्शक आहे.

संध्याकाळी 5 नंतर कसं वाढलं मतदान? 

हे ही वाचा >> Pune Crime News : कंपनीच्या पार्किंगमध्ये 28 वर्षीय तरूणीची कोयत्याने सपासप वार करत हत्या, कंपनीत सोबतच करत होते काम

राजीव कुमार यांनी अगदी सोप्या शब्दात सांगितलं की, जिल्हाधिकारी सकाळी 9:30, 11, 1, 3 पर्यंत मतदानाची अंदाजे आकडेवारी जाहीर केली जाते. पण 6 वाजूनही निवडणूक संपली नाही, तर निवडणूक आयोग योग्य आकडा कसा सांगू शकेल? मतदानाची वेळ संपल्यानंतर रांगेत उभ्या असलेल्या सर्वांना तिथेच थांबायला सांगितलं जातं आणि वेळेआधी रांगेत केंद्रावर पोहोचलेल्या लोकांचं मतदान करून घेतलं जातं.त्यानंतर मशीन सील करतात, बॅटरी सील करतात. 17C हाताने लिहा, एजंटला द्या, सील करा... अशा सर्व कामांना वेळ लागतो. त्यामुळे 6 वाजता मतदारांची संख्या जाहीर होते, पण त्यानंतर दुसऱ्या दिवशीपर्यंत ही संख्या अपडेट होते. 

मतदारांची संख्या वाढली

हे ही वाचा >> Torres Scam News : आठवभरातच मिळणार होतं 11 टक्के व्याज, कार्यालय बंद, फोन बंद, मालक फरार? काय आहे 'टोरेस'ची भानगड?

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितलं की, भारत एका ऐतिहासिक टप्प्याच्या जवळ पोहोचत असून, दिल्ली आणि आणखी चार राज्यांमध्ये जाहीर झालेल्या आमच्या मतदार याद्यांवरून असं दिसून येतं की, भारतात आता नोंदणीकृत मतदारांचा आकडा ९९ कोटींच्या वर गेला आहे. लवकरच, भारत एक अब्ज मतदारांचा देश बनणार आहे. त्यामुळे भारत जगातला सर्वात जास्त मतदारांची संख्या असलेला देश होणार आहे. विशेष म्हणजे नोंदणीकृत महिला मतदारांची संख्या 48 कोटींपेक्षा जास्त होणार आहे.त्यामुळे ही महिला सक्षमीकरणाच्यादृष्टीने एक सकारात्मक बाब आहे. 

    follow whatsapp