वीजबिल वसुलीसाठी गेलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्याला ग्राहकाने रॉडने मारहाण केल्याची गंभीर घटना घडली आहे. या मारहाणीत महावितरणचा कर्मचारी गंभीर जखमी झाली आहे. नागपूर शहरातल्या जयताळा वितरण केंद्र भागात ही घटना घडली आहे.
ADVERTISEMENT
महावितरणचे कर्मचारी सुखदेव केराम हे श्री.वाठ यांच्याकडे ५ हजार रुपयांच्या बिलाची थकबाकी वसुल करायला गेले होते. विशेष म्हणजे संबंधित कारवाईसाठी महावितरणाचं पथक गेलं असताना कुटुंबातील काही सदस्यांनी आधी महावितरणाच्या पथकासोबत शाब्दिक वाद घातला. त्यानंतर त्यांनी थेट केराम यांच्या डोक्यात लोखंडी हत्याराने प्रहार करत गंभीर जखमी केले.
वाढती गुन्हेगारी ठरतेय चिंतेचा विषय, NCRB च्या रेकॉर्डनुसार नागपूर गुन्हेगारीत अव्वल
संबंधित घटनेची माहिती वाऱ्यासारखी शहरात पसरली. काही महावितरण कर्मचारी आणि संघटनांचे प्रतिनिधी सोनेगाव पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यांनी संबंधित कुटुंबावर कारवाई करण्याची मागणी केली. पोलिसांनी सर्वांची बाजू ऐकून घेत कारवाईचं आश्वासन दिलं. तसेच आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
ADVERTISEMENT