माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेशला जामीन मंजूर करण्यात आला आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुखला PMPLA न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. १०० कोटी आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात जामीन मंजूर करण्यात आला आहे. CRPC कलम ८८ अंतर्गत ऋषिकेश देशमुख यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. ३ लाखांच्या जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर करण्यात आला आहे. १०० कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणात हा जामीन मंजूर करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
जामिनावर दोन्ही पक्षाचा युक्तिवाद पूर्ण झाला आणि त्यानंतर आज दुपारी निर्णय अपेक्षित होता. मागील सुनावणीच्या वेळी ऋषिकेश देशमुख यांनी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पी एम एल ए कोर्टात पूर्वी दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज मागे घेतला होता. मात्र सीआरपीसी कलम 88 अंतर्गत जामिनासाठी दाखल करण्यात आलेल्या अर्जावर सुनावणी पूर्ण झाली आहे. ज्यानंतर कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. १०० कोटी वसुली प्रकरणात ऋषिकेशला दिलासा मिळणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.
ADVERTISEMENT