माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांचे ओएसडी म्हणून काम पाहिलेले राम खांडेकर यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. ते 87 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात मुलगा मुकुल, सून संगिता आणि दोन नातवंडं असा परिवार आहे. राम खांडेकर यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे खासगी सचिव म्हणून काम पाहिले होते. 1991 मध्ये जेव्हा नरसिंह राव पंतप्रधान झाले तेव्हा राम खांडेकर हे त्यांचे ओएसडी झाले होते. राम खांडेकर हे पंतप्रधान नरसिंह राव यांच्या अत्यंत जवळच्या आणि विश्वासू व्यक्ंतींपैकी एक होते.
ADVERTISEMENT
राजकारणसोबतच राम खांडेकर यांनी विविध वृत्तपत्र आणि दिवाळी अंकांसाठीही लिखाण केलं आहे. त्यांच्या शासकीय सेवेतील अनुभवांवर त्यांनी सत्तेच्या पडछायेत नावाचं पुस्तक लिहिलं. 2019 मध्ये हे पुस्तक प्रकाशित झालं आहे. नेक दिवाळी अंकांसाठी त्यांनी त्यांच्या कामाबद्दल आणि अनेक राजकीय नेत्यांच्या गाठीभेटींसंदर्भातले ६० ते ७० लेख लिहिले.
राजकारण क्षेत्रासंदर्भातल्या त्यांच्या जवळपास पाच दशकांच्या अनुभवांबद्दल ते लोकसत्तामध्ये स्तंभलेखनही करत होते. २०१९ साली हे सर्व लेख ‘सत्तेच्या पडछायेत’ या पुस्तकाच्या रुपात प्रकाशित करण्यात आले.
ADVERTISEMENT