शिवसेनेला आणखी एक धक्का, नेते यशवंत जाधवांना ईडीकडून समन्स

दिव्येश सिंह

• 06:52 AM • 25 May 2022

मुंबई: शिवसेना नेते आणि मुंबई महापालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या अडचणी अधिक वाढल्या आहेत. सुरुवातीला आयकर विभागाकडून त्यांच्या घरावर आणि संबंधित ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली होती. मात्र आता थेट अंमलबजावणी संचलनालयाकडूनच (ED) फेमा (Foreign Exchange Management Act) अंतर्गत नोटीस बजावण्यात आली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने यशवंत जाधव यांना फेमासंदर्भात चौकशीसाठी समन्स बजावले आहे. […]

Mumbaitak
follow google news

मुंबई: शिवसेना नेते आणि मुंबई महापालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या अडचणी अधिक वाढल्या आहेत. सुरुवातीला आयकर विभागाकडून त्यांच्या घरावर आणि संबंधित ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली होती. मात्र आता थेट अंमलबजावणी संचलनालयाकडूनच (ED) फेमा (Foreign Exchange Management Act) अंतर्गत नोटीस बजावण्यात आली आहे.

हे वाचलं का?

अंमलबजावणी संचालनालयाने यशवंत जाधव यांना फेमासंदर्भात चौकशीसाठी समन्स बजावले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जाधव यांनी भायखळा येथील बिलकहाडी चेंबर्समध्ये अनेक फ्लॅट खरेदी करण्याचा प्रयत्न करत असताना परदेशात अमेरिकेतील एका मालकाला काही रक्कम दिली होती. जाधव यांनी केलेला हा व्यवहार बेकायदेशीर असल्याचा ईडीला संशय आहे आणि त्यामुळेच ईडीकडून त्याची चौकशी सुरू आहे.

यशवंत जाधव यांची चौकशी करत आयकर विभागाने जाधव आणि त्यांचे कुटुंबीय तसेच सहकारी यांच्या 41 मालमत्ता कथितरित्या जप्त केल्या होत्या. सूत्रांनी, इंडिया टुडेला सांगितले की, जप्त केलेल्या मालमत्तेत भायखळ्यातील बिलकहाडी चेंबर्स इमारतीतील 31 फ्लॅट, वांद्रे येथील 5 कोटी रुपयांचा फ्लॅट आणि भायखळ्यातील हॉटेल इम्पीरियल क्राउनचा समावेश आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जाधव यांनी न्यूजहॉक मल्टिमिडीया प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या कंपनीमार्फत कंत्राटदार बिमल अग्रवाल यांच्या मालकीची मालमत्ता, त्यांच्या सासू सुनंदा मोहिते यांच्या नावे हॉटेल आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईकांच्या नावे मालमत्ता खरेदी केली होती.

नेमकं प्रकरण काय?

काही दिवसांपूर्वी आयकर विभागाने यशवंत जाधव यांच्या मालमत्तांवर धाडी टाकत तपासाला सुरुवात केली होती. या तपासात यशवंत जाधव यांच्या परिवाराला बोगस कंपन्यांच्या माध्यमातून बिनव्याजी कर्ज मिळाल्याचं आयकर विभागाला समजलं होतं. या पैशांच्या माध्यमातून जाधव परिवाराने मनी लाँड्रींग केल्याचं आयकर विभागाचं म्हणणं असून यासंदर्भातले काही पुरावेही त्यांच्या हाती लागले आहेत.

याचसोबत आयकर विभागाने यशवंत जाधव यांचा मेव्हणा विलास मोहीते आणि पुतण्या विनीत जाधव यांना चौकशीसाठी हजर राहण्याचं समन्स बजावलं होतं. परंतू हे दोघंही चौकशीसाठी हजर राहीले नाहीत.

स्थायी समितीचे अध्यक्ष या नात्याने यशवंत जाधव यांनी महापालिकेत ज्या कंपन्यांना कंत्राट दिली त्याचीही आयकर विभागाने चौकशी केली. या चौकशीत जाधव परिवाराने प्रधान कंपनीला कर्जाची परतफेड म्हणून दिलेले पैसे हे विविध मार्गांनी फिरवून कंत्राटदार बिमल अग्रवालच्या कंपनीत आल्याचं समजलं. यातील पैशांमधून यशवंत जाधव यांनी आपल्या सासुबाई सुनंदा मोहीते यांच्या नावावर भायखळा परिसरात Imperial Crown नावाचं एक हॉटेलही खरेदी केल्याचं समोर आलं.

शिवसेना नेते यशवंत जाधवांच्या ४१ मालमत्ता आयकर विभागाकडून जप्त

‘या’ तक्रारीमुळे यशवंत जाधव आले अडचणीत

आयकर विभागाच्या कारवाईत समोर आलेली कंपनी Pradhan Dealers Pvt Ltd विरुद्ध The Registrar of Companies (ROC) ने तक्रार दाखल केली होती. Ministry of Corporate Affairs या प्रकरणात लक्ष घालत असल्याची बातमी ‘मुंबई Tak’ने याआधीच दिली होती. त्यामुळे ROC ने या प्रकरणात तक्रार दाखल करणं जाधवांना चांगलंच महागात पडलं आहे. कारण याच तक्रारीवरुन गुन्हा दाखल झाला असून आता ईडी या प्रकरणाचा तपास करणार आहे.

ROC ने या प्रकरणात मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यावरुन पोलिसांनी प्राथमिक चौकशीला सुरुवात केली होती. यानंतर आता या प्रकरणात ईडीची एंट्री झाली आहे. आयकर विभागाला आपल्या चौकशीत Pradhan Dealers Pvt Ltd कंपनीकडून यशवंत जाधव यांच्या परिवाराला 15 कोटी रुपये मिळल्याचं समजलं. हा आर्थिक व्यवहार अशा पद्धतीने झाला होता की 15 कोटी रुपये हे White Money च्या स्वरुपात दाखवण्यात आले होते. या प्रकरणात आयकर विभागाने आतापर्यंत यशवंत जाधव यांच्या पत्नी आमदार यामिनी जाधव, प्रधान कंपनीचा बोगस संचालक आणि एन्ट्री ऑपरेटर उदय शंकर महावरचा जबाब नोंदवला आहे.

स्थायी समितीचे अध्यक्ष या नात्याने यशवंत जाधव यांनी महापालिकेत ज्या कंपन्यांना कंत्राट दिली त्याचीही आयकर विभागाने चौकशी केली आहे. या चौकशीत जाधव परिवाराने प्रधान कंपनीला कर्जाची परतफेड म्हणून दिलेले पैसे हे विविध मार्गांनी फिरवून कंत्राटदार बिमल अग्रवालच्या कंपनीत आल्याचं समजलं. यातील पैशांमधून यशवंत जाधव यांनी आपल्या सासुबाई सुनंदा मोहीते यांच्या नावावर भायखळा परिसरात Imperial Crown नावाचं एक हॉटेलही खरेदी केल्याचं समोर आलं होतं.

ROC ने दाखल केलेल्या तक्रारीत प्रधान डिलर्स आणि इतर चार कंपन्यांच्या माध्यमातून मनी लाँड्रींग झाल्याचं म्हटलं आहे. या कंपन्या फक्त कागदावरच असून यांचा कोणताही बिझनेस नसल्याचं समोर आलं आहे.

    follow whatsapp