Shraddha murder case: आफताबच्या घराच्या बाथरूममध्ये आढळलं रक्त, फॉरेन्सिक टीमचा मोठा खुलासा

मुंबई तक

22 Nov 2022 (अपडेटेड: 01 Mar 2023, 09:02 AM)

Shraddha murder case: श्रद्धा वालकरच्या भयंकर हत्येच्या घटनेने सगळा देश हादरला आहे. आफताब पूनावालाने त्याची लिव्ह इन पार्टनर श्रद्धा वालकरची हत्या केली. त्यानंतर तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे केले. पोलिसांनी आफताबला अटक केली आहे. तसंच त्याच्या विरोधात पुरावे गोळा करण्यासाठी पोलिसांनी प्रयत्नांची शर्थ केली आहे. अशात आता फॉरेन्सिक टीमला आफताबच्या घरातल्या बाथरुममध्ये रक्ताचे नमुने मिळाले आहेत. […]

Mumbaitak
follow google news

Shraddha murder case: श्रद्धा वालकरच्या भयंकर हत्येच्या घटनेने सगळा देश हादरला आहे. आफताब पूनावालाने त्याची लिव्ह इन पार्टनर श्रद्धा वालकरची हत्या केली. त्यानंतर तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे केले. पोलिसांनी आफताबला अटक केली आहे. तसंच त्याच्या विरोधात पुरावे गोळा करण्यासाठी पोलिसांनी प्रयत्नांची शर्थ केली आहे. अशात आता फॉरेन्सिक टीमला आफताबच्या घरातल्या बाथरुममध्ये रक्ताचे नमुने मिळाले आहेत.

हे वाचलं का?

Shraddha Murder: एक होती श्रद्धा वालकर! प्रेमाच्या ३५ तुकड्यांची आक्रंदणारी कहाणी

काय म्हटलं आहे फॉरेन्सिक टीमने?

फॉरेन्सिक टीमच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आफताब आणि श्रद्धा ज्या घरात राहात होते त्या ठिकाणी जे बाथरूम आहे त्यामध्ये रक्ताचे ट्रेसेस फॉरेन्सिक टीमला मिळाला आहे. आफताबच्या घरातल्या बाथरूममधल्या टाइल्सवर रक्ताच्या खुणा मिळाल्या आहेत. याआधी फॉरेन्सिक टीमला स्वयंपाक घरातही काही रक्त असल्याचे ट्रेसेस आढळले होते. आता या संबंधीचा अहवाल हा दोन आठवड्यात येणार आहे.

आफताबची कोठडी चार दिवसांनी वाढवली

आफताब पूनावाला याला आज पोलिसांनी कोर्टात हजर केलं होतं. आज कोर्टाने त्याची कोठडी चार दिवसांनी वाढवली आहे. कोर्टात न्यायाधीशांसमोर आफताबने हे सांगितलं की मी रागाच्या भरात श्रद्धाची हत्या केली. मी त्यावेळी कुठलाही मागचा पुढचा विचार केला नाही. तसंच मी पोलिसांना तपासात मदत करणार असल्याचंही त्याने कोर्टाला सांगितलं.

Shraddha Murder श्रद्धाप्रमाणेच Dexter वेबसीरिज पाहून जगभरात झाल्या आहेत ‘इतक्या’ हत्या

आफताबने पोलिसांना सांगितलं की कुठे फेकलं हत्यार

आफताब पूनावालाने पोलिसांना सांगितलं की श्रद्धाची हत्या केल्यानंतर तिचे ३५ तुकडे ज्या हत्याराने केले ते हत्यार त्याने कुठे फेकलं हे पोलिसांना सांगितलं आहे. पोलिसांना आफताबने दिलेल्या माहितीनुसार आफताबने ती हत्यारं गुरूग्रामच्या DLF फेज ३ च्या झाडांमध्ये फेकली आहेत. दिल्ली पोलिसांनी २ वेळा गुरूग्रामच्या झाडा-झुडपांमध्ये तपास केला आहे. १८ नोव्हेंबरला काही पुरावे पोलिसांना मिळाले होते. त्यानंतर आता ते पुरावे फॉरेन्सिककडे पाठवण्यात आले आहेत. १९ नोव्हेंबरच्या तपासात मात्र पोलिसांना काहीही मिळालेलं नाही.

Bumble डेटिंग अॅपवर भेटले होते श्रद्धा आणि आफताब

Bumble या डेटिंग अॅपवर श्रद्धा वालकर आणि आफताब पूनावाला या दोघांची ओळख झाली होती. २०१८ मध्ये या दोघांची ओळख झाली. डेटिंग अॅपच्या माध्यमातून २०१९ ला दोघं भेटले. त्यानंतर लिव्ह इन मध्ये राहात होते.

या दरम्यान, पोलिसांनी जी माहिती या प्रकरणात दिली आहे त्यानुसार या दोघांमध्ये अलिकडे भांडणं वाढली होती. या दोघांनाही एकमेकांवर संशय होता. आफताबला वाटत होतं की श्रद्धाच्या आयुष्यात दुसरं कुणीतरी आहे. तर श्रद्धा हा दावा करत होती की आफताबच्या आयुष्यात दुसरं कुणीतरी आलं आहे. याच वादातून आफताबने १८ मे २०२२ ला श्रद्धाचा गळा दाबून खून केल्याचा आरोप आहे.

त्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी अफताबने अनेक पद्धतींनी प्रयत्न केले. आधी मृतदेहाचे 30 पेक्षा जास्त तुकडे करून ते फ्रीजमध्ये ठेवले. पुढचे अनेक दिवस ते तुकडे वेगवेगळ्या ठिकाणी फेकत राहिला. अलिकडेच सहा महिन्यांपासून श्रद्धाचा काहीच पत्ता नसल्याचं, तिची सोशल मिडियावरील अनुपस्थिती लक्षात येताच 10 नोव्हेंबरला श्रद्धाच्या वडिलांच्या तक्रारीवरून चौकशी केल्यानंतर ही घटना उघडकीस आली.

    follow whatsapp