मुंबई: नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (NSDL) ने तीन परदेशी फंडसची खाती गोठविली आहेत. या फंडद्वारे अदानी ग्रुपच्या कंपन्यांमध्ये तब्बल 43,500 कोटींची गुंतवणूक केली आहे. यामुळे अदानी ग्रुपच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. जाणून घेऊयात NSDL नेमकं आहे तरी
ADVERTISEMENT
नेमकं प्रकरण काय आहे?
नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (NSDL)ने Albula इन्व्हेस्टमेंट फंड, Cresta फंड आणि APMS इन्व्हेस्टमेंट फंड यांची खाती गोठविण्यात आली आहेत. डिपॉझिटरीच्या वेबसाइटनुसार, ही खाती 31 मे रोजी किंवा त्यापूर्वी फ्रीज करण्यात आलेली आहेत. हे तीनही फंड मॉरिशसचे असून सेबीकडे फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्स (FPIs) म्हणून नोंदणी केलेले आहेत.
दरम्यान, आज ही बातमी समोर आल्यानंतर अदानी ग्रुपच्या कंपन्यांच्या अनेक शेअर्समध्ये लोअर सर्किट लागलं आणि त्यांच्या मार्केट कॅपमध्ये देखील बरीच घसरण झाली आहे.
NSDL म्हणजे काय?
नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (NSDL) ही सरकारने 1996 साली स्थापन केलेली कंपनी आहे. भांडवली बाजाराचा म्हणजे डिपॉझिटरी म्हणजे एक प्रकारचं कोठार आहे. हे गुंतवणूकदारांचे शेअर आणि इतर सिक्युरिटीज डिमॅटेरियलाइज्ड म्हणजेच डिजिटल स्वरूपात सुरक्षित ठेवते.
भांडवल बाजारातील गुंतवणूकदारांना आणि ब्रोकर्संना मदत करण्यासाठी आणि त्यांचे शेअर्स संरक्षित करण्याच्या दृष्टीकोनातून काम करते. त्याच्या सहकार्यानेच शेअर बाजारात कार्यक्षमता, कमी जोखीम यासारख्या गोष्टी करता येतात.
हे लक्षात घेण्यासारखे आहे की, NSDL द्वारे पॅन कार्ड देखील बनवले जाते. हे पॅनशी संबंधित डेटा देखील संग्रहित केला जातो. यात जवळपास 261 लाख कोटी रुपयांच्या सिक्युरिटीज आहेत.
काय आहेत कायदेशीर हक्क?
NSDL ची स्थापना भारत सरकारने सप्टेंबर 1995 मध्ये जारी केलेल्या डिपॉझिटरीज अध्यादेशाद्वारे केली होती. या अध्यादेशाच्या आधारे भांडवली बाजार नियामक सेबीने मे 1996 मध्ये त्याचे डिपॉझिटरी आणि पार्टिसिपंट रेग्युलेशन्स जारी केली. यानंतर त्याच वर्षी ऑगस्टमध्ये डिपॉझिटरी कायदा लागू करण्यात आला.
सिक्युरिटीजच्या हस्तांतरण व सेटलमेंटसाठी डीमॅट मार्गाची तरतूद या कायद्यात करण्यात आली आहे. या कायद्याने दिलेल्या अधिकाराखाली NSDL ने आपले व्यवसायाचे नियम बनविले जे सेबीनेदेखील मंजूर केले आहेत.
NSDL च्या डिस्पिलरी अॅक्शन कमिटीला कोणत्याही सिक्युरिटीज (स्टॉक) मार्केट व्यवसायामधील कोणत्याही भागीदाराला निलंबित करणे, काढून टाकण्याची किंवा कोणतीही सुरक्षा ‘अपात्र’ घोषित करण्याचे अधिकार आहेत. या व्यतिरिक्त, कोणत्याही भागीदाराचे खाते गोठविण्याचा किंवा त्याबाबत चौकशी करण्याचा, त्याचे कॉल रेकॉर्ड करणे आणि त्याला नोटीस बजावण्याचा अधिकार आहे.
अदानीशी निगडीत खाती फ्रीज करण्याची हे असू शकतात कारणं
जरी अदानीशी संबंधित परदेशी गुंतवणूकदारांची खाती गोठवण्यामागचे कारण NSDL ने अद्याप जाहीर केलेले नाही, परंतु इकॉनॉमिक टाइम्सने काही सूत्रांचा हवाला देत सांगितले की, मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायदा (PMLA)अंतर्गत लाभार्थीबद्दल पुरेशी माहिती न दिल्यास खाती फ्रीज केली जाऊ शकतात.
PMLA अंतर्गत असे म्हटले आहे की, मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायदा (PMLA) 2002 नुसार बँका, वित्तीय संस्था आणि मध्यस्थांची जबाबदारी आहे की त्यांनी ग्राहकांच्या संभाव्य लाभार्थ्यांची ओळख पटवावी.
त्याचे प्रमोटर कोण आहेत?
NSDL चे प्रमोटर म्हणजे प्रमुख भागीदार भारत सरकार, औद्योगिक विकास बँक ((IDBI), युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (NSE) आहेत. या व्यतिरिक्त बर्याच मोठ्या बँकांचीही त्यात भागीदारी आहे.
ADVERTISEMENT