तब्बल 474 वर्षांनी अत्यंत दुर्मिळ योग, तो देखील रक्षाबंधनाच्याच दिवशी!

मुंबई तक

• 03:35 PM • 21 Aug 2021

22 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन साजरा होणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार रक्षाबंधनाच्या दिवशी एक अत्यंत दुर्मिळ असा योग आला आहे. यावेळी रक्षाबंधनासाठी जवळजवळ 12 तासांहून अधिकचा मुहूर्त आहे. त्यामुळे रक्षाबंधनाच्या संपूर्ण दिवसात कधीही राखी बांधता येईल. गुरु आणि चंद्र यांच्या युतीमुळे रक्षाबंधनाच्या दिवशी गजकेसरी योग निर्माण होणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार गजकेसरी योग हा अत्यंत भाग्यशाली मानला जातो. […]

Mumbaitak
follow google news

हे वाचलं का?

22 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन साजरा होणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार रक्षाबंधनाच्या दिवशी एक अत्यंत दुर्मिळ असा योग आला आहे.

यावेळी रक्षाबंधनासाठी जवळजवळ 12 तासांहून अधिकचा मुहूर्त आहे. त्यामुळे रक्षाबंधनाच्या संपूर्ण दिवसात कधीही राखी बांधता येईल.

गुरु आणि चंद्र यांच्या युतीमुळे रक्षाबंधनाच्या दिवशी गजकेसरी योग निर्माण होणार आहे.

ज्योतिष शास्त्रानुसार गजकेसरी योग हा अत्यंत भाग्यशाली मानला जातो.

याशिवाय रक्षा बंधनाला सिंह राशीत सूर्य, मंगळ आणि बुध ग्रह एकत्र विराजमान होणार आहेत.

ज्योतिष शास्त्रज्ञांचं असं म्हणणं आहे की, रक्षाबंधनाच्या दिवशी ग्रहांचा हा योग अत्यंत दुर्मिळ आहे.

हा योग तब्बल 474 वर्षांनी आला असल्याचं ज्योतिष शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.

रक्षा बंधनाच्या दिवशी राखी बांधण्यासाठी 12 तास 13 मिनिटांचा शुभ अवधी असेल.

आपण सकाळी 5.50 पासून ते संध्याकाळी 6.03 वाजेपर्यंत कोणत्याही वेळी राखी बांधू शकता.

    follow whatsapp