मलिकांच्या अडचणी वाढणार?; गोपनीयता भंग प्रकरणात फडणवीसांनी केली मलिकांच्या चौकशीची मागणी

मुंबई तक

• 11:28 AM • 13 Mar 2022

राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यात घोटाळा झाल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे. यासंदर्भात सीबीआयकडून तपास सुरू असल्याचंही ते म्हणाले. आज याच प्रकरणात मुंबई पोलिसांनी फडणवीसांचा जबाब नोंदवला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना फडणवीसांनी सरकार मला गोवण्याचा प्रयत्न करतंय, असा आरोप करत यात मलिकांची चौकशी केली पाहिजे, अशी मागणी केली. पत्रकार परिषदेत बोलताना सुरुवातीला फडणवीस म्हणाले, “मुंबई पोलिसांच्या […]

Mumbaitak
follow google news

राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यात घोटाळा झाल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे. यासंदर्भात सीबीआयकडून तपास सुरू असल्याचंही ते म्हणाले. आज याच प्रकरणात मुंबई पोलिसांनी फडणवीसांचा जबाब नोंदवला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना फडणवीसांनी सरकार मला गोवण्याचा प्रयत्न करतंय, असा आरोप करत यात मलिकांची चौकशी केली पाहिजे, अशी मागणी केली.

हे वाचलं का?

पत्रकार परिषदेत बोलताना सुरुवातीला फडणवीस म्हणाले, “मुंबई पोलिसांच्या एक पथकाने बदली घोटाळा प्रकरणात जबाब नोंदवला आहे. मी त्यांना सर्व प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. महाराष्ट्र सरकारने मागील ६ महिन्यांपासून हे प्रकरण दाबून ठेवलं होतं. या प्रकरणात मी व्हिसलब्लोअर आहे,” असं त्यांनी सांगितलं.

Devendra fadnavis : फडणवीसांची दोन तास चौकशी; जबाब नोंदवून मुंबई पोलीस परतले

गोपनीयता भंगाबद्दल बोलताना फडणवीस म्हणाले, “गोपनीयतेचा भंग झाला असेल, तर तो कुणी केला? सर्व कागदपत्रे जी मी केंद्रीय गृहसचिवांना दिली होती, ती मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकारांना दिली. त्यामुळे चौकशी झाली, तर त्यांची झाली पाहिजे. कारण हे गोपनीय कागदपत्रे होती, असं पोलीस सांगत आहेत, तर मग ते मलिकांना पत्रकारांना देण्याचा अधिकार होता का? ते त्यांनीच दिले आहेत”, असं फडणवीस म्हणाले.

“मला कितीही गोवण्याचा प्रयत्न केला, तरी सरकार मला या प्रकरणात गोवू शकत नाही. हे काळे कारनामे मी बाहेर काढतच राहणार आहे. जेवढी माहिती मला मिळेल, तर ती मी पोहोचवतच राहणार आहे. मी जबाबदार नागरिकासारखं सर्व संवेदनशील माहिती प्रसिद्धीच्या मागे न लागता, सार्वजनिक न करता ते संबंधितांना दिलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की, हा जो चौकशी करण्याचा उपक्रम झाला आहे. त्यातून सरकारला काहीही हाती लागणार नाही. त्यांचे मनसुबे पूर्ण होणार नाहीत”, असा इशारा फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला.

मला आरोपी, सहआरोपी करण्याचा प्रयत्न; फडणवीसांचा सरकारवर गंभीर आरोप

“वेळीच सरकारने या कांडाची चौकशी करायला हवी होती. सहा महिने सरकार यावर बसून होतं. आता ते बाहेर येत आहे. त्यामुळे त्याची चौकशी सोडून आमचे कांड का बाहेर आले, याची चौकशी केली जातेय. त्यावरून आमचे घोटाळे कुणी बाहेर काढू नये असं दिसून येतंय. अजित पवार काय म्हणाले मी ऐकलं नाही. पण, ज्याचा लोकशाहीवर विश्वास आहे, त्याला हे पटणार नाही,” असं फडणवीस म्हणाले.

मुंबई पोलिसांकडून पुन्हा चौकशी होणार आहे का? तशी काही माहिती देण्यात आली आहे का? असा प्रश्न फडणवीसांना विचारण्यात आला होता. त्याला फडणवीसांनी मिश्कील भाषेत उत्तर दिलं. “आज मला त्यांनी पुन्हा येईन असं सांगितलं नाही”, असं फडणवीस म्हणाले.

    follow whatsapp