ऑफिसमधून मोठी रजा मिळावी यासाठी एका महिलेने (Woman Office Leave) असं काही कृत्य केलं की ज्यामुळे भल्याभल्यांना मोठा आश्चर्याचा धक्का बसला आहे. पगार आणि रजा या दोन्ही गोष्टी एकाच वेळी मिळाव्यात यासाठी महिलेने स्वत:ला गर्भवती असल्याचं जाहीर केलं होतं. पण तसं काहीही नव्हतं. पण फुकटच्या सुट्टीची झिंग महिलेला एवढी चढली होती की, तिने यासाठी चक्क खोटा बेबी बंपही तयार करुन घेतला होता. एवढंच नव्हे तर एका व्यक्तीला तिने तिचा बनावट पती देखील बनवलं होतं.
ADVERTISEMENT
दरम्यान, या सगळ्यामागचं सत्य बाहेर आल्यानंतर अमेरिकेच्या 43 वर्षीय रॉबिन फोलसम (Robin Folsom) हिला आपली चांगली नोकरी गमवावी लागली. इतकंच नाही तर फॉलसमविरोधातही चौकशी देखील सुरू करण्यात आली आहे. आता हे प्रकरण न्यायालयात देखील पोहोचलं आहे.
प्रसूती रजेसाठी अर्ज
‘डेली स्टार’च्या रिपोर्टनुसार, फॉलसम एका मार्केटिंग एजन्सीमध्ये वार्षिक 75 लाख रुपये पगारावर काम करत होती. तिने तिच्या बॉसकडे प्रसूती रजेसाठी (Maternity Leave)अर्ज केला. फॉलसमचे बेबी बंप (Baby Bump) पाहून ती प्रेग्नंट (Pregnant) आहे असे सर्वांना वाटले. अशा परिस्थितीत बॉसने तिला सुट्टी देखील दिली. परंतु लवकरच तिची चोरी पकडली गेली.
खरं तर, फॉलसमच्या एका सहकर्मीला तिचा बेबी बंप थोडा विचित्र वाटला. त्या महिलेचा बेबी बंप वर-खाली होत असल्याचे तिने पाहिले होते. त्यामुले तिने ही माहिती ऑफिसमधील वरिष्ठांना दिली. नंतर असे उघड झाले की, फॉलसम हिने गर्भवती दिसण्यासाठी चक्क खोटा बेल्ट घातला होता, ज्यामुळे तिच्या पोटात फुगवटा (बेबी बंप) दिसून येत असे.
खरं म्हणजे फॉलसम ही काही गरोदर नव्हती. पण आर्टिफिशियल बेबी बंप लावून तिने ऑफिसमध्ये सर्वांना फसवलं होतं आणि सुट्टीच्या काळात पगार मिळावा म्हणून मॅटर्निटी लीव्ह घेतली होती. असाही आरोप आहे की फॉलसमने आपल्या मुलासाठी ‘ब्रान ओटमेम्ब्वे’ असे बनावट वडिलांचे नाव शोधून काढले होते. मात्र, याबाबत अद्याप फारशी माहिती मिळू शकलेली नाही.
रॉबिन फोलसमच्या या फसवणुकीमुळे संतप्त झालेल्या कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तिच्याविरुद्ध तपास सुरू केला आहे. दरम्यान, याबाबत सत्य समोर आल्यानंतर तिला केवळ नोकरीतूनच काढून टाकण्यात आले नाही, तर तिच्यावर फसवणुकीचा गुन्हाही दाखल करण्यात आला. ही घटना मार्च 2021 मधील आहे. पण आता याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर हे संपूर्ण प्रकरण आता चर्चेत आलं आहे.
ADVERTISEMENT