कोरोनावर उपचारासाठी बनावट औषधसाठा जप्त, मुंबई पोलिसांची कारवाई

मुंबई तक

• 06:11 AM • 08 Jun 2021

कोरोना रुग्णांवर उपचारासाठी बनावट औषधं तयार करुन चढ्या भावाने विकणाऱ्या दोघांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. समता नगर पोलिसांनी अन्न आणि औषध विभागाच्या मदतीने ही कारवाई केली आहे. मेरठ मधील धीरखेडा भागातील औद्योगिक क्षेत्र वसाहतीत बनावट औषध बनवणाऱ्या कंपनीवरही पोलिसांनी कारवाई केली आहे. या कंपनीचा मालक संदीप मिश्रा व त्याचा साथीदार सुदीप मुखर्जीला पोलिसांनी अटक […]

Mumbaitak
follow google news

कोरोना रुग्णांवर उपचारासाठी बनावट औषधं तयार करुन चढ्या भावाने विकणाऱ्या दोघांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. समता नगर पोलिसांनी अन्न आणि औषध विभागाच्या मदतीने ही कारवाई केली आहे. मेरठ मधील धीरखेडा भागातील औद्योगिक क्षेत्र वसाहतीत बनावट औषध बनवणाऱ्या कंपनीवरही पोलिसांनी कारवाई केली आहे. या कंपनीचा मालक संदीप मिश्रा व त्याचा साथीदार सुदीप मुखर्जीला पोलिसांनी अटक केली आहे.

हे वाचलं का?

काही दिवसांपूर्वी मिळालेल्या माहितीवरुन अन्न आणि औषध विभागाने मुंबईतील कांदिवली आणि गोरेगाव भागातील औषधांच्या होलसेल डिलरच्या गोडाऊनवर छापा मारला होता. या छापेमारीत FDA ला १.५ कोटींची Favimax 400 आणि 200 औषधांच्या गोळ्या सापडल्या होत्या. अधिक चौकशी केली असता ही औषधं बनवणाऱ्या Max Relief Healthcare कंपनीकडे आवश्यक परवानगी नसल्याचं समोर आलं.

३० मे रोजी आरोपी सुदीप मुखर्जीने FDA च्या अधिकाऱ्यांना आपल्याकडे असलेली लायसन्सची कॉपी दाखवली होती. पण तपासणीमध्ये हे लायसन्स बनावट असल्याचं लक्षात आलं. यानंतर FDA ने समता नगर पोलीस ठाण्यात याविषयी माहिती दिली. यानंतर समता नगर पोलिसांनी कारवाई करत या कंपनीचा मालक असलेल्या संदीप मिश्राला अटक केली आहे. या दोघांकडून पोलिसांनी २२ लाखांचा बनावट औषधसाठा जप्त केला असून पोलीस पुढील कारवाई करत आहेत.

    follow whatsapp