उपमुख्यमंत्री अजित पवारांचा नंबर वापरून पुण्यातील प्रसिद्ध बिल्डरला खंडणीसाठी धमकी

मुंबई तक

• 11:45 AM • 14 Jan 2022

पुण्यातल्या एका प्रसिद्ध बिल्डरला अजित पवारांचा नंबर वापरून 20 लाखांची खंडणी मागितल्याचं घटना घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली असून या प्रकरणी सहा जणांनी अटक केली आहे. किरण काकडे, चैतन्य काकडे, आकाश निकाळजे, नवनाथ चोरमाले, सौरभ काकडे आणि सुनील उर्फ बाळा गौतम वाघमारे अशी अटक करण्यात आली आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाडे बोल्हाई या ठिकाणी […]

Mumbaitak
follow google news

पुण्यातल्या एका प्रसिद्ध बिल्डरला अजित पवारांचा नंबर वापरून 20 लाखांची खंडणी मागितल्याचं घटना घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली असून या प्रकरणी सहा जणांनी अटक केली आहे. किरण काकडे, चैतन्य काकडे, आकाश निकाळजे, नवनाथ चोरमाले, सौरभ काकडे आणि सुनील उर्फ बाळा गौतम वाघमारे अशी अटक करण्यात आली आहेत.

हे वाचलं का?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाडे बोल्हाई या ठिकाणी जागेचा वाद सुरू होता. आरोपींनी गुगल प्लेवरून फेक कॉल अॅप डाऊनलोड केलं. त्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मोबाईल क्रमांक वापरून आरोपींनी बिल्डरला फोन केला. ‘मी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पीए बोलतो आहे, वाडे बोल्हाई येथील शिरसाटवाडी येथील बाबा भाऊ चोरमले यांच्यासह हेक्टर जमिनीचा वाद मिटवून टाका. बिल्डरला गावात पाय ठेवून देणार नाही आणि तुमचे कोणतेही प्रोजेक्ट होऊ देणार नाही’ अशी धमकी देत 20 लाखांची खंडणी मागण्यात आली.

आरोपींना दोन लाख देण्यात आले होते. मात्र आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच फिर्यादी बिल्डरने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यानंतर किरण रामभाऊ काकडे, चैतन्य राजेंद्र काकडे, आकाश शरद निकाळजे,नवनाथ भाऊसाहेब चोरमले,सौरभ नारायण काकडे आणि सुनिल ऊर्फ बाळा गौतम वाघमारे या सहा आरोपींना अटक करण्यात आली. बंडगार्डन पोलीस अधिक तपास करीत आहेत.

    follow whatsapp