पुणे: अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Actress Sonali Kulkarni) हीने काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण लग्न केलं असल्याची माहिती देत आपल्या चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. मात्र, असं असताना दुसरीकडे सोनाली कुलकर्णी हिच्या पुण्यातील (Pune) घरात काल (24 मे) रात्री एक धक्कादायक घटना घडली आहे.
ADVERTISEMENT
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, काल रात्री पुण्यातील सोनालीचा एक चाहता (Fan) अचानक तिच्या घरात घुसला. यावेळी सोनालीच्या वडिलांनी त्याला घराबाहेर जाण्यास देखील सांगितलं. मात्र, त्याने आपल्या जवळील चाकूने त्यांच्यावरच वार केले. सुदैवाने या हल्ल्यात त्यांना गंभीर दुखापत झाली नाही. मात्र, एकूणच या संपूर्ण प्रकरणामुळे सोनालीच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.
दरम्यान, या प्रकाराबाबत आपण कोणतीही तक्रार करणार नसल्याचं सोनाली कुलर्णीच्या वडिलांनी ‘मुंबई तक’शी बोलताना सांगितलं आहे.
नेमकं काय घडलं?
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिचं पुण्यातील निगडी येथील वरलक्ष्मी बंगल्यात काल रात्री अचानक एक व्यक्ती दोरीच्या साहाय्याने बंगल्याच्या गॅलरीत शिरला. यावेळी सोनालीच्या वडिलांना या व्यक्तीला घरातून बाहेर जाण्यास सांगितलं. मात्र, तो त्यांचं काहीही ऐकून घेण्यास तयार नव्हता. वारंवार त्यांनी त्याला बाहेर जाण्यास सांगितलं. मात्र, ही व्यक्ती घरातून बाहेर पडण्यास तयार नव्हती. अचानक त्याने आपल्याजवळील चाकू काढून सोनालीच्या वडिलांवर वार केले. सुदैवाने यामध्ये फक्त त्यांच्या हाताला दुखापत झाली.
हा सगळा गोंधळ लक्षात येताच त्यांच्या शेजाऱ्यांनी आणि इतर काही जणांनी त्या व्यक्तीला पकडण्याचा प्रयत्नही केला. मात्र, त्याचवेळी त्याने आपल्या जवळील मिरची पूड लोकांवर फेकली. अखेर या सगळ्या प्रकाराची जेव्हा पोलिसांना माहिती मिळाली तेव्हा पोलिसांनी तात्काळ त्याला बेड्या ठोकल्या.
वाढदिवसाच्याच दिवशी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने दिली ‘ही’ गोड बातमी
दरम्यान, अटक करण्यात आलेल्या व्यक्तीकडे चाकू आणि मिरची पूड होती हे पाहता तो व्यक्ती नक्की सोनालीचा चाहता होता की, चोरीच्या बहाण्याने तो त्यांच्या घरात घुसला होता? याचा देखील आता पोलीस तपास करत आहेत.
HBD Sonalee- पत्रकारितेचं शिक्षण घेऊन अभिनेत्री झाली सोनाली कुलकर्णी
घडल्या प्रकाराबाबत सोनाली कुलकर्णीने नेमकी काय माहिती दिली?
दरम्यान, याप्रकरणी नेमकं काय घडलं हे जाणून घेण्यासाठी ‘मुंबई तक’ने सध्या दुबईत असलेल्या अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्याशी फोनवरुन संपर्क साधाला. यावेळी सोनालीने अशी माहिती दिली की, ‘मला देखील या संपूर्ण प्रकाराबाबत नुकतीच माहिती मिळाली आहे. मी काही वेळापूर्वीच घरच्यांशी फोनवरुन बोलले आहे. काल रात्री ती व्यक्ती घरात घुसली होती आणि तिने माझ्या वडिलांवर चाकूने हल्ला केला. यावेळी वडिलांच्या हाताला दोन जखमा झाल्या आहेत. पण सुदैवाने ते पूर्णपणे बरे आहे. दरम्यान, निगडी पोलिसांनी या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन आरोपीला अटक केली आहे. तसंच माझ्या कुटुंबीयांना देखील योग्य ती मदत केली आहे.’ अशी माहिती सोनालीने यावेळी दिली.
जाणून घ्या सोनाली कुलकर्णीच्या नवऱ्याविषयी…
दरम्यान, 18 मे रोजी सोनालीने आपल्या 33व्या वाढदिवशी लग्न केलं. वाढदिवसाच्याच दिवशी तिने कुणाल बेनोदकर याच्यासोबत लग्नगाठ बांधली. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये सोनालीचा साखरपुडा झाला होता. तर 18 मे रोजी दुबईमध्येच कुणाल आणि सोनालीचं लग्न झालं होतं.
ADVERTISEMENT