Thane Crime News : ठाणे जिल्ह्यातील शहापूर परिसरात लग्न समारंभात झालेल्या वादातून तरुणाची हत्या केली. चाकूने भोसकून 21 वर्षीय तरूणाला संपवण्यात आलं आहे. आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी या घटनेनंतर मृतदेह नदीत फेकून दिला. याप्रकरणी पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> बीडमध्ये धमक्या देणाऱ्या तरूणाला दगडाने ठेचून संपवलं, स्वप्निल देशमूखचा 'त्याच' झाडाखाली शेवट
शाहपूरच्या कजगावमध्ये 25 मार्च रोजी ही घटना घडली. शाहपूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं की, बाळू वाघ असं मृताचं नाव असून तो व्यवसायाने ट्रॅक्टर चालक होता.
डान्स करताना वाद झाला
लग्न समारंभात वरातीदरम्यान नाचत असताना बाळू वाघ आणि अल्पवयीन मुलामध्ये बाचाबाची झाली. हा वाद इतका वाढला की, अल्पवयीन व त्याच्या मित्रांनी मिळून बाळू वाघ याला जवळच्या निर्जन भागात नेलं. तिथे त्याच्यावर सपासप चाकूने वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या बाळू वाघचा तिथेच मृत्यू झाला.
मृतदेह नदीत फेकून दिला
हत्या करुन अल्पवयीन आरोपी तिथेच थांबले नाही. नंतर दोन्ही अल्पवयीन मुलांनी मृतदेह भातसा नदीत फेकून तिथून पळ काढला. दुसऱ्या दिवशी 26 मार्च रोजी नदीत मृतदेह आढळून आल्यानं पोलिसांनी तपास सुरू केला.
हे ही वाचा >> Raj Thackeray : छावा सिनेमाचा फिव्हर ते औरंगजेबाची कबर, राज ठाकरे यांनी 'तो' नरेटीव्ह हाणून पाडला?
अल्पवयीन आरोपींना अटक
तपासादरम्यान, या हत्येत दोन 17 वर्षीय मुलांचा सहभाग असल्याचं पोलिसांना आढळून आलं. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन हत्येच्या आरोपाखाली भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल केला आहे. सध्या दोन्ही आरोपींची भिवंडी येथील रिमांड होममध्ये रवानगी करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
