Sushant Singh च्या मृत्यूचं गूढ कायम, चाहत्यांकडून अभिनेत्याला आदरांजली

मुंबई तक

• 06:41 AM • 14 Jun 2021

अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या संशयास्पद मृत्यूला आज एक वर्ष पूर्ण झालं. आजच्या दिवशी वांद्रे येथील राहत्या घरी सुशांतचा मृतदेह सापडला होता. सुशांतच्या मृत्यूला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमीत्ताने त्याच्या चाहत्यांनी मुंबईतील घराबाहेर त्याला श्रद्धांजली वाहिली. सुशांतच्या फोटोसमोर मेणबत्ती पेटवत चाहत्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. सुरुवातीला मुंबई पोलीस सुशांतच्या मृत्यूचा तपास करत होतं. परंतू यानंतर सुरु झालेल्या […]

Mumbaitak
follow google news

हे वाचलं का?

अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या संशयास्पद मृत्यूला आज एक वर्ष पूर्ण झालं. आजच्या दिवशी वांद्रे येथील राहत्या घरी सुशांतचा मृतदेह सापडला होता.

सुशांतच्या मृत्यूला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमीत्ताने त्याच्या चाहत्यांनी मुंबईतील घराबाहेर त्याला श्रद्धांजली वाहिली. सुशांतच्या फोटोसमोर मेणबत्ती पेटवत चाहत्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

सुरुवातीला मुंबई पोलीस सुशांतच्या मृत्यूचा तपास करत होतं. परंतू यानंतर सुरु झालेल्या राजकारणानंतर हा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आला.

सीबीआयकडे हा तपास वर्ग होऊन वर्षाचा कालावधी उलटला तरीही सुशांतच्या मृत्यूमागचं ठोस कारण समोर आलेलं नाही. त्यामुळे सुशांतच्या चाहत्यांनी सीबीआय चौकशीतून लवकरात लवकर या प्रकरणातलं सत्य समोर आणण्याची मागणी केली आहे.

सुशांतला न्याय मिळावा यासाठी चाहत्यांनी आज त्याच्या घरासमोर प्रार्थना केली.

वर्षभरानंतरही सीबीआय तपासात ठोस माहिती समोर येत नसल्यामुळे चाहत्यांनी या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण केलंय. दुसरीकडे काँग्रेस आणि भाजपमध्येही या प्रकरणावरुन आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरुच आहेत. त्यामुळे सीबीआय आता सुशांतच्या मृत्यूमागचं खरं कारण शोधण्यात यशस्वी ठरते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

    follow whatsapp