नाश्ता देण्यावरून उडाला खटका! ७६ वर्षीय सासऱ्याने सूनेला घातली गोळी

मुंबई तक

• 09:13 AM • 15 Apr 2022

ठाणे परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सून नाश्ता देत नसल्याच्या रागातून 76 वर्षीय सासऱ्याने गोळी झाडून तिची हत्या केली आहे. काशीनाथ पाटील असं या आरोपी सासऱ्याचं नाव असून या घटनेनंतर तो फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार पाटील कुटुंब ऋतुपार्क भागातील विहंग सोसायटीमध्ये रहायचे. एकत्र कुटुंब पद्धतीत राहत असलेल्या काशिनाथ […]

Mumbaitak
follow google news

ठाणे परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सून नाश्ता देत नसल्याच्या रागातून 76 वर्षीय सासऱ्याने गोळी झाडून तिची हत्या केली आहे. काशीनाथ पाटील असं या आरोपी सासऱ्याचं नाव असून या घटनेनंतर तो फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

हे वाचलं का?

मिळालेल्या माहितीनुसार पाटील कुटुंब ऋतुपार्क भागातील विहंग सोसायटीमध्ये रहायचे. एकत्र कुटुंब पद्धतीत राहत असलेल्या काशिनाथ पाटील यांची काळजी त्यांची सून घेत होती. परंतू असं असूनही काशिनाथ पाटील बाहेर सून माझी काळजी घेत नाही, नाश्ता देत नाही असं सांगायचे.

मंगळवेढ्यातली ब्रिटिश कालीन चांदीची नाणी चोरणारा चोर गजाआड

सुनेला ही बाब समजल्यानंतर, सासऱ्यांची कितीही काळजी घेऊनही बाहेर आपली अशी बदनामी केली जात असल्यामुळे तिने एक दिवस सासऱ्यांना नाश्ता दिला नाही. त्याच्या दुसऱ्या दिवशीही काशिनाथ यांना नाश्ता हवा होता, म्हणून त्यांनी आपल्या ड्रायव्हरकरवी सुनेला नाश्ता मागितला. ज्यानंतर सुनेने सासऱ्यांना चहा दिला आणि आम्ही तुमची काळजी घेत असूनही बाहेर अशी बदनामी का करता, आम्हाला ब्लॅकमेल का करता असा प्रश्न विचारला.

मुंबईहून लग्नासाठी गावी निघालेली खासगी बस उलटली, भीषण अपघातात २५ जण जखमी

यानंतर झालेल्या वादात रागावलेल्या सासऱ्याने आपल्या रिव्हॉल्वरने गोळी झाडली. या हल्ल्यात जखमी झालेल्या सुनेला घरच्यांनी स्थानिक हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. परंतू तिच्या तब्येतीत सुधारणा न झाल्यामुळे तिला पुढील उपचाराकरता ज्युपिटर हॉस्पिटलला हलवण्यात आलं. इथे उपचारादरम्यान आज या सुनेचा मृत्यू झाला. दरम्यान पोलिसांनी सासरे काशिनाथ पाटील यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करत त्यांच्या शोधासाठी पोलीस पथकं पाठवली आहेत. तसेच ज्या रिव्हॉल्वरने त्यांनी गोळी झाडली ते रिव्हॉल्वरही पोलिसांनी जप्त केलं आहे.

दिल्लीच्या अक्षरधाम मेट्रो स्टेशनवरून उडी मारणाऱ्या तरूणीचा उपचारा दरम्यान मृत्यू

    follow whatsapp