फर्टिलिटी डॉक्टरने महिलांना दिला धोका, तब्बल 14 वेळा वापरलं स्वत:चं स्पर्म!

मुंबई तक

• 03:15 PM • 04 Jan 2022

Doctor uses own sperm for ivf: जे लोक कधीच नैसर्गिरित्या आई-बाबा बनू शकत नाहीत, ते बहुतेक वेळा फर्टिलिटी सेंटर (IVF) कडे वळतात. मुलांच्या हसण्या-रडण्याचा आवाज त्यांच्या घरातही गुंजेल अशी त्यांनाही आशा असते. बर्‍याच लोकांसाठी फर्टिलिटी क्‍लीनिक हा एक आशेचा किरण आहे. त्यामुळेच अनेक जण मोठ्या आशेने डॉक्टरांकडे जातात. पण एक डॉक्टरने असं काही केलं आहे […]

Mumbaitak
follow google news

Doctor uses own sperm for ivf: जे लोक कधीच नैसर्गिरित्या आई-बाबा बनू शकत नाहीत, ते बहुतेक वेळा फर्टिलिटी सेंटर (IVF) कडे वळतात. मुलांच्या हसण्या-रडण्याचा आवाज त्यांच्या घरातही गुंजेल अशी त्यांनाही आशा असते. बर्‍याच लोकांसाठी फर्टिलिटी क्‍लीनिक हा एक आशेचा किरण आहे. त्यामुळेच अनेक जण मोठ्या आशेने डॉक्टरांकडे जातात. पण एक डॉक्टरने असं काही केलं आहे की ज्यामुळे या सगळ्याच प्रक्रियेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

हे वाचलं का?

एक डॉक्टर हा त्याच्या फर्टिलिटी क्‍लिनिकमध्ये येणाऱ्या महिलांना स्वत:चे स्पर्म वापरायचं ज्यामुळे अनेक महिला या गर्भवती देखील राहिल्या होत्या. या सगळ्यातील धक्कादायक बाब म्हणजे यापैकी एकाही दाम्पत्याला त्याने आपण असं काही करत आहोत याची माहितीच दिली नव्हती.

पॉल जोन्स (Dr Paul Jones) असे या डॉक्टरचे नाव आहे. डॉ. पॉल हा अनेक दिवसांपासून अशाच प्रकारे आपलं क्लिनिक चालवत होता. मात्र अखेर त्याच्या कृत्याचा पर्दाफाश झालाच. त्याच्या या कृत्याची चक्क एका टीव्ही शोमध्ये पोलखोल झाली.

डेली स्टारच्या वृत्तानुसार, या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा माइया सिमन्स (Maia Simmons) आणि ताहनी स्कॉट (Tahnee Scot) या दोन बहिणींनी केला आहे. या सर्व गोष्टी त्यांनी The Truth About My Conception या न्यूज प्रोगाममध्ये जाहीर केल्या आहेत.

वास्तविक, या दोन्ही मुलींचे वडील जॉन इमॉन्स हे टेस्टिक्युलर कॅन्सरशी (Testicular cancer) झुंज देत होते. याचा अर्थ जॉन आणि त्याची पत्नी चेरिल एमन्स यांना नैसर्गिकरित्या मुले होऊ शकत नव्हती. 1980 आणि 1985 साली ते आरोपी डॉ. पॉलच्या अमेरिकेतील वेस्टर्न कॉलेरेडो क्लिनिकमध्ये गेले होते. डॉ. पाल याने यावेळी चेरिलला न सांगता स्वतःचे शुक्राणू हस्तांतरित केले.

2018 मध्ये Ancestry.com वर कोणीतरी त्याच्याशी संपर्क साधला. Ancestry.com ही एक वेबसाइट आहे जिथे लोक एकमेकांशी संवाद साधतात. यामध्ये लोक त्यांच्या पिढीचा आणि पूर्वजांचाही शोध घेतात. या वेबसाइटवर प्रत्येकजण मेसेज पाठवून एकमेकांशी बोलू शकतो. ज्यामध्ये ते जनुकशास्त्राच्या आधारे एकमेकांना शोधतात. याच वेबसाइटच्या माध्यमातून माइया हिला एक मेसेज मिळाला.

मेसेजमध्ये लिहिले होते की, ‘आम्ही भाऊ-बहीण आहोत असे वाटते. माझे वडील कोलरडोमध्ये स्पर्म डोनर आहेत. मला माझ्यासारखी दिसणारी आणखी 3 भावंडं सापडली आहेत.’

Facebook खरंच बनत चाललंय का सेक्स ट्रॅफिकिंग भरतीचे केंद्र?

दुसरीकडे, माइया आणि ताहनी यांनी आता अनुवांशिक चाचणी वेबसाइटद्वारे अशा 12 भावंडांचा शोध लावला आहे. म्हणजेच एकूण 14 महिलांसोबत डॉक्टरांनी असे केले असल्याचे उघड झालं आहे. जेव्हापासून माइयाला हे कळले तेव्हापासून ती खूप संतापली आहे.

माइया म्हणाली की, मला हे तब्बल 38 वर्षांनी समजले आहे. दरम्यान, ही गोष्ट उजेडात आल्यानंतर डॉ. जोन्सचा 2019 मध्ये वैद्यकीय परवाना जप्त करण्यात आला होता.

    follow whatsapp