केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी आज संसदेच्या सभागृहात अर्थसंकल्प सादर करायला सुरुवात केली आहे. आपल्या भाषात सुरुवातीच्या टप्प्यामध्ये सितारामन यांनी यंदाचा अर्थसंकल्प Health, Human Capital, Innovation and R&D, Physical Infrastructure या चार महत्वाच्या गोष्टींवर आधारीत असल्याचं सांगितलं. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउन काळात देशातील आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण पडला.
ADVERTISEMENT
यासाठी निर्मला सितारामन यांनी आत्मनिर्भर स्वस्थ भारत योजनेची घोषणा केली आहे. या योजनेसाठी सरकारकडून ६४ हजार १८० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याचसोबत आरोग्य विभागासाठीच्या निधींमध्येही अधिकची तरतूद करण्यात आली आहे. सितारामन यांनी आपल्या भाषणात स्वच्छ भारत मिशनला आणखी पुढे राबवण्याची घोषणा केली आहे. भारताच्या शहरी भागांमधील अमृत योजनेसाठी २ लाख ८७ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यावेळी बोलत असताना सितारामन यांनी मिशन पोषण २.० ची घोषणा केली.
२०२१ मध्ये भारतात कोरोनाच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. आगामी काळात लसीकरणारंच महत्व लक्षात घेता सितारामन यांनी कोरोना लसीकरणासाठी ३५ हजार कोटींच्या निधीची तरतूद केली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात आरोग्य विभागाच्या निधीमध्ये १३७ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT