Optical Illusion Test : सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्यूजनचे अनेक फोटो व्हायरल होतात. या फोटोंना पाहिल्यानंतर लोकांमध्ये गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळतं. परंतु, ज्या लोकांकडे तल्लख बुद्धी असले, त्यांना अशाप्रकारचे फोटो खूपच आवडतात. कारण या फोटोंमध्ये लपलेल्या बारीक सारीक गोष्टी शोधण्यात हे लोक त्यांच्या बुद्धीला कस लावतात. आताही अशाप्रकारचा ऑप्टिकल इल्यूजनचा फोटो व्हायरल झाला असून यात लपलेला 9 नंबर शोधण्याचं आव्हान असणार आहे. ज्या लोकांची नजर गरुडासारखी तीक्ष्ण असेल, तेच लोक ऑप्टिकल इल्यूजनच्या या टेस्टमध्ये पास होऊ शकतात.
ADVERTISEMENT
ऑप्टिकल इल्यूजनच्या फोटोत लपलेल्या गोष्टी आपल्या डोळ्यांसमोरच असतात. परंतु, त्या गोष्टी सहजरित्या दिसत नाहीत. या फोटोतही ६ नंबरच्याऐवजी ९ नंबर लिहिण्यात आला आहे. पण हा नंबर शोधण्यासाठी तुमच्याकडे तीक्ष्म नजर असणे आवश्यक आहे. या फोटोत लपलेला ९ नंबर शोधणं वाटतं तितकं सोपं नाही. कारण हा ९ नंबर शोधण्यात अनेकांना अपयश आलं आहे.
हे ही वाचा >> Ladaki Bahin Yojana: आधार कार्डचं 'हे' काम आताच करुन घ्या! तरच मिळतील लाडकी बहीण योजनेचे पैसे
ऑप्टिकल इल्यूजनच्या टेस्टमध्ये अनेकांना आलंय अपयश
ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो पाहिल्यानंतर कदाचीत डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. या फोटोंना पाहिल्यानंतर अनेक जण चक्रावून जातात. या फोटोत सर्व ठिकाणी ६ नंबर असल्याचं दिसत आहे. परंतु, ९ हा नंबर दिसत नाही. ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो पाहिल्यानंतर अनेकांचा गोंधळ उडतो. कारण हे फोटो डोळ्यांना चकवा देणारे असतात. ऑप्टिकल इल्यूजनच्या टेस्टचं अचूक उत्तर देण्यात अनेकांना यश मिळत नाही.
पण तुम्ही या ऑप्टिकल इल्यूजनच्या टेस्टमध्ये यशस्वी होऊ शकता. तुम्हाला फक्त तीक्ष्ण नजरेने हा फोटो पाहायचा आहे. या फोटोत सर्व ठिकाणी 6 नंबर लिहिले असले, तरी तुम्ही लपलेला ९ नंबर शोधू शकता. तुम्हाला फक्त फोटोत असलेली एक एक लाईन व्यवस्थित पाहायची आहे. जेणेकरून तुम्हाला 6 नंबरऐवजी 9 नंबर नेमका कुठे लपला आहे, ते माहित होईल. एव्हढा प्रयत्न करूनही तुम्हाला 9 अंक दिसला नसेल, तर आम्ही तुम्हाला फोटोत लपलेला 9 नंबर दाखवणार आहोत. फोटोत सातव्या लाईनवर मध्यभागी पाहिलं, तर तुम्हाला ९ नंबर तिथे दिसेल.
ADVERTISEMENT