गुजरातच्या भरूचमध्ये कोव्हिड रूग्णालयाला आग लागून 16 जणांचा मृत्यू झाला आहे. पहाटे १ वाजण्याच्या सुमारास ही आग लागली अशी माहिती भरूचचे जिल्हाधिकारी डॉ. मोध्या यांनी दिली. 16 कोरोना रूग्णांना या घटनेत त्यांचे प्राण गमावावे लागले आहेत. या ठिकाणी एकूण 70 रूग्णांवर उपचार सुरू होते. हे चारमजली रूग्णालय आहे, या ठिकाणी 70 रूग्णांवर उपचार सुरू होते. तसंच या 70 रूग्णांपैकी 24 जणांवर आयसीयू मध्ये उपचार सुरू होते. या रूग्णांची स्थानिकांनी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी सुटका केली. उर्वरित सर्व रूग्णांना आता वेगवेगळ्या रूग्णांलयांमध्ये दाखल करण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT
रूग्णालयाला लागलेली आग सुमारे एक तासाने आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली ते अद्याप स्पष्ट झालेलं नाही, असं अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने सांगितलं. गुजरातची राजधानी अहमदाबादपासून हे भरूचचं रूग्णालय सुमारे 190 किमी अंतरावर आहे. एका ट्रस्टमार्फत हे रूग्णालय चालवण्यात येतं.
या रूग्णालयाला रात्री १ च्या सुमारास आग लागली. लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आला पण तोपर्यंत ही आग मोठ्या प्रमाणावर पसरली होती. त्यामुळे या घटनेत सोळा रूग्णांचा मृत्यू झाला. कोव्हिड सेंटरला आग लागल्याचं कळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटना स्थळी दाखल झाल्या. त्यांनी एक तास प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. या ठिकाणी पोलीसही हजर झाले होते, त्यांनी तातडीने लोकांच्या बचावकार्याला सुरूवात केली.
Mumbra Fire: मुंब्रा येथील प्राइम क्रिटिकेअर हॉस्पिटलला आग, 4 रुग्णांचा मृत्यू
ही फक्त आमच्यासाठीच नाही तर संपूर्ण भरूचसाठी एक दुर्दैवी घटना आहे असं वक्तव्य रूग्णालयाचे ट्रस्टी जुबैर पटेल यांनी केलं आहे. पोलिसांच्या मदतीने आम्ही कोव्हिड रूग्णांना इतर रूग्णालयांमध्ये दाखल केलं आहे. या घटनेत 16 जणांचा मृत्यू झाला ही घटना अत्यंत वेदनादायी आहे असंही पटेल यांनी म्हटलं आहे.
भरूचच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आयसीयूमध्येही 20 पेक्षा जास्त रूग्णांवर उपचार सुरू होते. या घटनेत जे जखमी झाले आहेत त्यांच्यावरही उपचार सुरू करण्यात आले आहेत.
ADVERTISEMENT