देशाची राजधानी दिल्लीत न्यायालयाच्या परिसरातच कुख्यात गुंडाची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची घटना घडली. रोहिणी न्यायालायच्या परिसरात भरदिवसा घडलेल्या या घटनेनं दिल्ली हादरली.
ADVERTISEMENT
न्यायालयाच्या परिसरातच झालेल्या गँगवारने राजधानी दिल्लीत खळबळ उडाली. दिल्लीतील रोहिणी न्यायालयाच्या परिसरात झालेल्या गोळीबारात चार जणांचा मृत्यू झाला. यात दिल्ली पोलिसांसाठी मोस्ट वाँटेड असलेल्या जितेंद्र गोगीची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. गोळीबाराच्या या घटनेत तीन ते चार व्यक्ती जखमी झाल्या आहेत. गोगीला सुनावणीसाठी न्यायालयात आणण्यात आलं होतं.
न्यायाधीशासमोर हजर करण्यापूर्वीच ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे दोन हल्लेखोर वकिलाच्या वेशात न्यायालयात आले होते. न्यायालयाच्या परिसरात आल्यानंतर दोघांनी जितेंद्र गोगीवर अचानक गोळ्या झाडल्या. यात गोगीचा जागीच मृत्यू झाला.
दिल्लीचे पोलीस आयुक्त राकेश अस्थाना यांनी सांगितलं की कुख्यात गुंड गोगीला सुनावणीसाठी न्यायालयात नेण्यात आलं होतं. जिथे त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. आरोपींनी गोळीबार केल्यानंतर पोलिसांनी प्रत्युरात गोळीबार केला. ज्यात दोन्ही हल्लेखोर ठार झाले. त्यातील एका ५० हजाराचं बक्षीस घोषित करण्यात आलेलं होतं.
ADVERTISEMENT