आर्यन खान ड्रग्ज केस प्रकरणातल्या ‘या’ दोन आरोपींना जामीन मंजूर

विद्या

• 03:38 PM • 26 Oct 2021

आर्यन खान ड्रग्ज केस प्रकरणात आज दोन आरोपींना जामीन मिळाला आहे. NDPS कोर्टाने आज या प्रकरणात दोघांना जामीन मंजूर केला आहे. मनिष राजघारिया आणि अविन साहू अशा दोघांना कोर्टाने 50 हजारांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणात जामीन मंजूर झालेले हे पहिलेच दोन जण आहेत. मनिष राजघारीया आणि अविन साहू हे दोघे क्रूझवरचे […]

Mumbaitak
follow google news

आर्यन खान ड्रग्ज केस प्रकरणात आज दोन आरोपींना जामीन मिळाला आहे. NDPS कोर्टाने आज या प्रकरणात दोघांना जामीन मंजूर केला आहे. मनिष राजघारिया आणि अविन साहू अशा दोघांना कोर्टाने 50 हजारांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणात जामीन मंजूर झालेले हे पहिलेच दोन जण आहेत.

हे वाचलं का?

मनिष राजघारीया आणि अविन साहू हे दोघे क्रूझवरचे प्रवासी असल्याचं सांगण्यात आलं. एनसीबीने राजघारीयाकडून 2.4 ग्रॅम गांजाही केला होता. तर अविन साहूकडून काहीही जप्त करण्यात आलं नव्हतं. कोर्टाने गेल्या आठवड्यात या दोघांच्या जामिनावरचा निर्णय राखून ठेवला होता. एक सहआरोपी मनिष राजघारियाचे वकील अजय दुबे यांनी पत्रकारांना याची माहिती दिली आहे. मुंबई शहरातील विशेष एनडीपीएस न्यायायाने मनीष राजघारियाला जामीन मंजूर केल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

Exclusive: आर्यन खान ड्रग्ज केसमध्ये मोठा ट्विस्ट, के.पी. गोसावीच्या बॉडीगार्डने केला ‘हा’ धक्कादायक खुलासा

दरम्यान जज व्ही. व्ही. पाटील मंगळवारी यावर सुनावणी घेतली. अॅडव्होकेट अयाझ खान यांनी नुपूर सतलेजाच्या बाजूने युक्तीवाद केला होता. आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांच्या जामीन अर्जांवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या सुनावणीमध्ये आर्यन खानच्या जामीन अर्जावरची सुनावणी पूर्ण झाली असून आता अरबाज मर्चंटच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू आहे. आजचं कोर्टाचं कामकाज पूर्ण झाल्यानंतर आता उद्या दुपारी ही सुनावणी पुन्हा सुरू केली जाणार आहे. त्यामुळे आजची रात्र देखील आर्यन खानला तुरुंगातच काढावी लागणार आहे.

चमचमत्या बॉलिवूडची ड्रग्ज नावाची काळी बाजू आणि NCB ने केलेली कारवाई

अन्य आरोपी गोमित चोप्रातर्फे वकील कुशल मोर यांनी युक्तिवाद केला की तो एक तरुण, सुशिक्षित आहे. तो अवघ्या चार वर्षांचा होता तेव्हा त्याचे वडील वारले आहेत. त्याचे संगोपन त्याच्या आईनेच त्यानंतर केलं आहे. मोर यांनी असा युक्तिवाद केला की चोप्राचा खान किंवा व्यापारी किंवा धनेचा यांच्याशी कोणताही संबंध नाही आणि त्यांच्याकडे जे काही आढळले ते त्यांच्या स्वत: च्या वैयक्तिक वापरासाठी होते जर एजन्सीचे प्रकरण मान्य करायचे असेल तर. आर्यन खान आणि गोमित यांच्यात कुठलेही व्हॉट्स अॅप चॅटही नाहीत असंही मोर यांनी म्हटलं आहे.

    follow whatsapp