नोव्हेंबर महिन्यापासून सुरु होणारा थंडीचा काळ हा कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सुगीचा काळ मानला जातो. या कालावधीत हापूस आंब्याचं पिक शेतकऱ्याच्या हातात येतं. विशेषकरुन रत्नागिरी आणि देवगड या दोन हापूस आंब्यांना बाजारात मोठी मागणी असते.
ADVERTISEMENT
यंदाच्या हंगामातली देवगड हापूस आंब्याची पहिली पेटी बाजारात आली असून या पेटीला विक्रमी भावही मिळाला आहे. मालवणच्या कुंभारमाठ येथील आंबा बागायतदार उत्तम खांडेकर यांच्या बागेतील पहिल्या पेटीला १८ हजारांचा भाव मिळाला आहे. खांडेकर यांनी ५-५ डझनच्या दोन पेट्या पुण्यातील ग्राहकासाठी पाठवल्या आहेत.
मालवणमध्ये खांडेकर यांनी सलग तिसऱ्यांना हंगामातली पहिली पेटी विकण्याचा मान मिळवला आहे. सर्वसामान्यपणे हापूस आंबा बाजारात येण्यासाठी फेब्रुवारी ते मार्च महिन्याचा कालावधी उलटतो. परंतू नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात हाती आलेल्या पिकातून आंबा बागायतदार अनेकदा परदेशांत आपला माल पाठवत असतात.
ADVERTISEMENT