महाराष्ट्रासाठी टेन्शन वाढवणारी बातमी सलग तिसऱ्या दिवशी समोर आली आहे. महाराष्ट्रात सलग तिसऱ्या दिवशी ८ हजार २३३ रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर दिवसभरात ४८ मृत्यूंची नोंद झाली आहे. आज राज्यात ४ हजार ९३६ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आत्तापर्यंत राज्यात एकूण २० लाख १७ हजार ३०३ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठवण्यात आलेल्या १ कोटी ६१ लाख १२ हजार ५१९ नमुन्यांपैकी २१ लाख ३८ हजार १५४ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.
ADVERTISEMENT
सध्या राज्यात ३ लाख १८ हजार ७०७ व्यक्ती होमक्वारंटाईन आहेत तर २ हजार ६८८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आज घडीला ६७ हजार ६०८ अॅक्टिव्ह रूग्ण आहेत. आज राज्यात ८ हजार ३३३ नवीन रूग्णांची नोंद झाली आहे. ज्यामुळे राज्यातील एकूण रूग्णांची संख्या २१ लाख ३८ हजार १५४ इतकी झाली आहे.
आज नोंद झालेल्या ४८ मृत्यूंपैकी २५ मृत्यू हे मागील ४८ तासांमधले आहेत तर १७ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित ६ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे सहा मृत्यू सातारा २, वर्धा २, अकोला १ आणि ठाणे १ असे आहेत. अशी माहितीही आरोग्य विभागाने दिली आहे.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरं आणि अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या
मुंबई – ७ हजार ८९९ अॅक्टिव्ह रूग्ण
ठाणे – ७ हजार २७६ अॅक्टिव्ह रूग्ण
पुणे – १२ हजार ५७७ अॅक्टिव्ह रूग्ण
नाशिक – २ हजार १८५ अॅक्टिव्ह रूग्ण
औरंगाबाद- २ हजार ५२ अॅक्टिव्ह रूग्ण
अमरावती- ६ हजार ७४० अॅक्टिव्ह रूग्ण
अकोला – २ हजार १९३ अॅक्टिव्ह रूग्ण
बुलढाणा – १ हजार ८०४ अॅक्टिव्ह रूग्ण
यवतमाळ – १ हजार ३६१ अॅक्टिव्ह रूग्ण
नागपूर – ९ हजार १४१ अॅक्टिव्ह रूग्ण
ADVERTISEMENT