भारताचे माजी अॅटर्नी जनरल सोली सोराबजी यांचे कोरोनाने निधन

मुंबई तक

• 04:02 AM • 30 Apr 2021

मुंबई: देशाचे माजी अॅटर्नी जनरल सोली सोराबजी (Former Attorney General of India, Soli Sorabjee) यांचे आज (30 एप्रिल) सकाळी निधन (succumbed) झाले आहे. ते 91 वर्षांचे होते. मागील बरेच दिवस त्यांची प्रकृती खराब होती. त्यातच त्यांना कोरोनाची देखील लागण झाली असल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. भारताचे माजी ज्येष्ठ विधीज्ञ आणि पद्मविभूषण सोली सोराबजी यांचं कोरोनाने […]

Mumbaitak
follow google news

मुंबई: देशाचे माजी अॅटर्नी जनरल सोली सोराबजी (Former Attorney General of India, Soli Sorabjee) यांचे आज (30 एप्रिल) सकाळी निधन (succumbed) झाले आहे. ते 91 वर्षांचे होते. मागील बरेच दिवस त्यांची प्रकृती खराब होती. त्यातच त्यांना कोरोनाची देखील लागण झाली असल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. भारताचे माजी ज्येष्ठ विधीज्ञ आणि पद्मविभूषण सोली सोराबजी यांचं कोरोनाने निधन झालं आहे. मात्र त्यांच्या कुटुंबीयांकडून याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. सोली सोराबजी हे 1989 ते 90 आणि पुन्हा 1998 ते 2004 पर्यंत देशाचे अॅटर्नी जनरल होते.

हे वाचलं का?

सोली सोराबजी यांचा जन्म १९३० साली मुंबईत झाला होता. १९५३ पासून ते मुंबई उच्च न्यायालयात प्रॅक्टिस करत होते. १९७१ साली सोराबजी यांची सुप्रीम कोर्टाचे सीनियर काउंसिल म्हणून नियुक्ती झाली होती. त्यानंतर दोनदा भारताचे अॅटर्नी जनरल म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती.

सोली सोराबजी हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे कट्टर समर्थक होते. त्यांनी सर्वोच्च न्यायालयात अनेक ऐतिहासिक प्रकरणात माध्यमांचे स्वातंत्र अबाधित राखण्याची भूमिका घेतली होती. तसंच प्रकाशनांवरील सेन्सॉरशिपचे आदेश आणि मंजुरी रद्द करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

वर्षा गायकवाड यांचे वडील माजी खा. एकनाथ गायकवाड यांचं कोरोनानं निधन

दरम्यान, मार्च 2002 साली त्यांना देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्म विभूषण पुरस्कारने सन्मानित करण्यात आलं होतं.

देशात कोरोनाचा कहर

देशात कोरोना व्हायरसमुळे परिस्थिती अधिक भयंकर बनत चालली आहे. मागील 24 तासात देशात तब्बल 3,86,452 नवे रुग्ण सापडले आहेत. तर 3498 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, काल देशभरात 2,97,540 रुग्ण बरे झाले आहेत.

देशभरात आतापर्यंत एकूण 1,87,62,976 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर आपर्यंत तब्बल 2,08,330 हजार जणांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत. देशात सध्या कोरोनाचे 31,70,228 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

पद्मभूषण पंडित राजन मिश्रा यांचं निधन, दिल्लीतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

दरम्यान, सध्या देशातील कोरोनाचा रिकव्हरी रेट घटला आहे. सध्या रिकव्हरी रेट हा 82.10 टक्के एवढा आहे. तर मृत्यूदर 1.11 इतका आहे.

    follow whatsapp