Beed : बीडमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या घटना कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या आहेत. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा मुद्दा राज्यभरात गाजला, त्यावरुन संतापाची लाट निर्माण झाली. एकीकडे या घटनेचा तपास सुरूच असताना दुसरीकडे अशाच गुन्ह्यांच्या घटनांची मालिका अजूनही सुरूच आहे. बंदुकीच्या जोरावर केल्या जाणाऱ्या दहशतीनंतर आता कुलूप सुद्धा चर्चेत आलं आहे.
ADVERTISEMENT
सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात करण्यात आली होती. त्यांच्यावर अत्यंत निघृणपणे हल्ला करत त्यांची विटंबना करत त्यांना मारल्याचा आरोप कुटुंबीयांकडून करण्यात येतोय. तर दुसरीकडे आता बीडमध्ये पुन्हा एका सरपंचाला डांबून मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. एक माजी सरपंच पायात कुलूप घातलेल्या अवस्थेत पोलीस अधीक्षक कार्यालयात दाखल झाला आणि सगळेच हादरले. ज्ञानेश्वर इंगळे माजी सरपंचाचं नाव असून, ते केज तालुक्यातील कळंबा येथील रहिवासी आहेत.
हे ही वाचा >> Mumbai Tak Chavdi: "शंभर टक्के वाल्मिक कराडचं नाव 302 मध्ये येईल...", सुरेश धस यांनी दिली खळबळजनक माहिती
"पंकजा मुंडे यांच्याकडून फंड देतो म्हणून केज मधून मुंबईला जायचं म्हणून गाडीत बसवलं. पाटोदा येथे गेल्यानंतर 3 लाख रुपये काढून घेत एका खोलीत हात आणि पाय बांधून डाबून ठेवलं. पायाला साखळदंड बांधण्यात आले. त्याला थेट कुलूपही लावलं. कशीतरी सुटका करून धावत पळून आलो" असं पीडित सरपंचाने सांगितलं आहे. या संदर्भात पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रार दिली असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
हे ही वाचा >> Rajan Salvi : उद्धव ठाकरेंची साथ सोडणार, राजन साळवी 'या' पक्षात प्रवेश करणार, कोकणात मशालीच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह?
विशेष म्हणजे या माजी सरपंचाच्या पायात कुलूप लावलेलं दिसत आहे. तर हातालाही दोरी बांधल्याचे व्रण दिसत आहेत. यामुळे खळबळ उडाली असून याचा पोलीस तपास घेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून घडत असलेल्या या घटनांमध्ये काही गोष्टींवरुन साम्य आढळत असल्यानं कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
ADVERTISEMENT
