Ambulance रस्त्यातच बंद पडली… शिवसेनेच्या माजी आमदाराने उपचाराभावी सोडले प्राण

मिथिलेश गुप्ता

03 Mar 2023 (अपडेटेड: 26 Mar 2023, 05:07 PM)

Former Shiv Sena MLA Surykant Desai passed away : डोंबिवली : शिवसेनेचे (Shivsena) माजी आमदार सूर्यकांत देसाई (Surykant Desai) यांचे शुक्रवारी सकाळी ११ च्या सुमारास डोंबिवलीत निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. उपचारादरम्यान त्यांना एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात दाखल करताना रुग्णवाहिका मध्येच बंद पडल्याने त्यांचं उपचाराभावी निधन झाल्याचं त्यांच्या कुटुंबियांनी सांगितलं. देसाई १९९५ ते २००० […]

Mumbaitak
follow google news

Former Shiv Sena MLA Surykant Desai passed away :

हे वाचलं का?

डोंबिवली : शिवसेनेचे (Shivsena) माजी आमदार सूर्यकांत देसाई (Surykant Desai) यांचे शुक्रवारी सकाळी ११ च्या सुमारास डोंबिवलीत निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. उपचारादरम्यान त्यांना एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात दाखल करताना रुग्णवाहिका मध्येच बंद पडल्याने त्यांचं उपचाराभावी निधन झाल्याचं त्यांच्या कुटुंबियांनी सांगितलं. देसाई १९९५ ते २००० या यादरम्यान लालबाग-परळ विधानसभा मतदारसंघातून आमदार होते. त्यानंतर मागील २२ वर्षांपासून ते डोंबिवली पश्चिममधील भागशाला मैदान भागातील काशीकुंज सोसायटीमध्ये राहत होते. (Former Shiv Sena MLA Surykant Desai passed away in Dombivli at around 11 am on Friday)

नेमकं काय घडलं?

कालपासून माजी आमदार देसाई यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. यानंतर देसाई यांच्यावर डोंबिवली पूर्वेकडील एका रुग्णालयात उपचार सुरू होते. यावेळी श्वासाचा त्रास वाढल्याने त्यांना व्हेंटिलेटरची गरज होती. मात्र व्हेंटिलेटर नसल्याने रुग्णलयाने त्यांना दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यास सांगण्यात आलं.

Shivsena तुमच्या बापाची आहे का भो*%#? संजय राऊतांचा तोल ढळला!

यानंतर दुसऱ्या रुग्णालयातून देसाई यांना घेऊन जात असताना रुग्णालयासमोरच रुग्णवाहिका बंद पडली. रुग्णवाहिका बंद पडल्याने देसाई यांना रुग्णवाहिकेतून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नेत असताना रुग्णवाहिका ढकल्याची वेळ कुटुंबीयांवर आली होती. कुटुंबियांना हॉस्पिटल ते मंजुनाथ शाळेपर्यतच्या रुग्णवाहिका ढकलावी लागली. यानंतर नादुरुस्त रुग्णवाहिका रस्त्यात बंद पडल्याने आणि उशीरा हॉस्पिटल पोहोचल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे आरोप नातेवाईकांनी केला. याबाबत देसाई यांचा मुलगा ऋषिकेश यांनी साई पूजा रुग्णवाहिका विरोधात रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार असल्याचे सांगितले.

Shivsena : ठाकरेंच्या आमदारांना शिंदेंचा व्हिप; आदेश डावलल्यास आमदारकी जाणार?

● बाळा नांदगावकर यांना अश्रू अनावर

देसाई यांच्या निधनाची बातमी कळताच पूर्वाश्रमीचे शिवसैनिक आणि आताचे मनसे नेते बाळा नांदगावकर यांना अश्रू अनावर झाले. ते म्हणाले, देसाई हे शिवसेनेचे जुने नेते आणि आमदार होते. माझी कारकीर्द त्यांच्यामुळे घडली. रुग्णवाहिका बंद पडल्याने त्यांचा उपचारअभावी मृत्यू झाला हे धक्कादायक आहे. यासंबंधीची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली असून याची चौकशी व्हावी अशी मागणी यावेळी नांदगावकर यांनी केली. राज्यात अशाप्रकारे रुग्णवाहिका बंद पडून कोणाचा बळी जाऊ नये असे देखील ते म्हणाले.

    follow whatsapp