नागपूरच्या जवाहरलाल नेहरू केंद्रीय चिकित्सालयातल्या कोव्हिड केअर सेंटरमध्ये ऑक्सिजन संपल्याने चार रूग्णांचा मृत्यू झाला आहे. या चिकित्सालयात दोन दिवसांपूर्वीच कोव्हिड केअर सेंटर सुरू करण्यात आलं होतं. या ठिकाणी 29 कोरोना रूग्णांवर उपचार सुरू होते. WCL कडून हे कोव्हिड केअर सेंटर चालवण्यात येत होतं. चार मृत्यू झाल्यानंतर या ठिकाणी त्या रूग्णांच्या नातेवाईकांनी आंदोलन केलं. त्यानंतर या ठिकाणी आता पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. मात्र या सगळ्या प्रकरणात रूग्णालय प्रशासनाने मौन बाळगलं आहे. नागपूर कन्हान पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार नोंदवण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
अहमदनगर: जिल्हा रूग्णालयात ऑक्सिजन सिलिंडर बंद पडल्याने 2 कोरोना रूग्णाचा मृत्यू
हे रूग्णालय WCL तर्फे चालवलं जातं. 27 मार्चला या रूग्णालयात कोव्हिड केअर सेंटर सुरू करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र या आदेशाकडे 8 तारखेपर्यंत लक्ष दिलं गेलं नाही. मात्र आम्ही आणि काही संघटनांनी आवाज उठवला की इथलं कोव्हिड केअर सेंटर लवकरात लवकर सुरू करा. त्यानंतर जिल्हा परिषदेतर्फे एक डॉक्टर आणि दोन-तीन परिचारिका येथे देण्यात आल्या आणि चार-पाच कोरोना रूग्ण या ठिकाणी दाखल झाले.
10 एप्रिलला मंत्री सुनील केदार हे या ठिकाणी आले त्यांनी सांगितलं की जर 48 खाटांचं रूग्णालय आहे तर त्या सगळ्या खाटा मिळाल्या पाहिजेत. इथे असलेले डॉक्टर्स, परिचारिका यांनीही मदत करावी असे आदेश त्यांनी दिले. त्यानंतर 10 तारखेपासून या ठिकाणी कोव्हिड केअर सेंटर पूर्ण क्षमतेने सुरू झाले. 11 एप्रिलला 16 रूग्ण दाखल झाले. त्यानंतर 12 तारखेच्या रात्रीपर्यंत या ठिकाणी एकूण 29 रूग्ण कोरोनावरच्या उपचारांसाठी दाखल झाले. या 29 पैकी 7 ते 8 रूग्ण यांची ऑक्सिजन लेव्हल कमी झाली होती. ते गंभीर होते, मात्र कामठी आणि नागपूर कुठेही बेड्सची व्यवस्था झाली नाही त्यामुळे नाईलाजाने या रूग्णांना इथेच रहावं लागत होतं.
Lockdown आणि कोरोनाला कंटाळून केशकर्तनालय दुकानदाराची आत्महत्या
मात्र 13 तारखेला इथला ऑक्सिजन संपला.. त्याकडे लक्ष देण्यासाठी कुणीही नव्हतं. एक डॉक्टर आणि दोन नर्स यांच्यावर हॉस्पिटल्स रूग्णालयाची जबाबदारी देण्यात आली होती. मुख्य डॉक्टरांना फोन करण्यात येत होता मात्र त्यांचा फोन बंद होता. मुख्य डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे हे चार बळी गेले आहेत असा आरोप WCL युनियनचे अध्यक्ष शिवकुमार यादव यांनी केला आहे.
ADVERTISEMENT