नागपूर: वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यानंतर विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस, युवासेनेच्यावतीनं अनेक ठिकाणी आंदोलन केलं जात आहे. सत्ताधारी जमेल तसे आरोप फेटाळण्याचा प्रयत्न करत आहेत. अशातच आता वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
ADVERTISEMENT
सुधीर मुनगंटीवार काय म्हणाले?
”फॉक्सकॉन बदल विरोधकांचे आरोप तर्कशुण्य आहेत. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना नॅनो महाराष्ट्रात येणार होता पण तो गुजरातमध्ये गेला. तेव्हा आम्ही काही म्हटलं नाही. शिंदे यांच्या नेतृत्त्वात भुमिका स्पष्ट आहे की राज्याच्या औद्योगिक विकासासाठी धोरणं आखली जाणार आहे. वेदांता यांनी स्पष्ट केलंय, की ते महाराष्ट्रात गुंतवणूक करणार आहेत.” असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत.
रिफायनरीवरुन सुधीर मुनगंटीवारांनी शिवसेनेवरती टीका केली आहे. ”जैतापूर आणि नाणारवर सेनेने भूमिका बदललीस आहे. भुमिका बदलल्याने त्यांना सत्तेवरुन दूर जावं लागलं. जनतेच्या मनात बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेला जे स्थान मिळवून दिलं होतं, त्याला आता धक्का बसला आहे. मागच्या सरकारच्या उदासीनतेमुळे प्रकल्प बाहेर गेले, तेव्हा आम्ही राजकारण केलं नाही” असं मुनगंटीवार म्हणाले आहेत.
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंवरती साधला निशाणा
सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावरती निशाणा साधला आहे. ”सत्ता गेल्यापासून सुप्रिया ताईंच्या वक्तव्यातवरुन दिसतेय की त्यांची सत्ता गेली आहे. नाना पटोले यांच्याकडे दुसरे मुद्दे नाही. आम्ही शेतकरी, सर्वसामान्यांसाठी चांगले निर्णय घेतले.
गेले आठ महिने उद्योग महाराष्ट्रात लावण्याबाबत उद्योगपती चर्चा करत होते, तेव्हा वाटाघाटी होत होत्या… तेव्हा हे महाविकास आघाडी सरकार गंभीर नव्हते.” फडणवीस रशियाला गेले आहे. ते आल्यावर यावर गंभीरतेणे चर्चा होणार आहे, उद्योग कुठेही जाणार नाही. धोरणं बदलायची गरज असेल तेही बदलू असं मुनगंटीवार म्हणाले आहेत.
ADVERTISEMENT