Dr. Babasaheb Ambedkar: जिथे बॅरिस्टर पदवी घेतली तिथेच डॉ. आंबेडकरांचा ‘असा’ करण्यात आला सन्मान

मुंबई तक

01 Jul 2021 (अपडेटेड: 29 Mar 2023, 10:02 PM)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांचे संपूर्ण देशातील अनुयायी आणि विशेषत: महाराष्ट्रासाठी (Maharashtra) एक फार चांगली बातमी आहे. ती म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लंडनमधील (London) ज्या ‘ग्रेज इन’ कोर्टातून बॅरिस्टर पदवी मिळवली तिथेच आता डॉ. आंबेडकर यांचा एक खास फोटो लावून सन्मान करण्यात आला आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असलेले बाबासाहेब आंबेडकर यांनी अतिशय […]

Mumbaitak
follow google news

डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांचे संपूर्ण देशातील अनुयायी आणि विशेषत: महाराष्ट्रासाठी (Maharashtra) एक फार चांगली बातमी आहे. ती म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लंडनमधील (London) ज्या ‘ग्रेज इन’ कोर्टातून बॅरिस्टर पदवी मिळवली तिथेच आता डॉ. आंबेडकर यांचा एक खास फोटो लावून सन्मान करण्यात आला आहे.

हे वाचलं का?

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असलेले बाबासाहेब आंबेडकर यांनी अतिशय खडतर परिस्थितीतून मार्ग काढत बॅरिस्टर होण्यापर्यंतची मजल मारली होती. जिथून त्यांनी बॅरिस्टर पदवी मिळवली तिथेच त्यांचं तैलचित्र लावणं जाणं हा एक प्रकारे अवघ्या भारताचाच बहुमान आहे.

ब्रिटिश राजकीय तज्ज्ञ आणि मानवाधिकार कार्यकर्ते लॉर्ड डेव्हिड अल्टन यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून लंडनच्या ‘ग्रेझ इन’ ​​मध्ये डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांचा जा फोटो लावण्यात आला आहे ते आपल्या ट्विटरवरुन शेअर केलं आहे. यावेळी लॉर्ड डेव्हिड अल्टन यांच्यासमवेत बाबासाहेबांचे पणतू सुजात आंबेडकर हे देखील उपस्थित होते.

लॉर्ड डेव्हिड अल्टन यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिले आहे की, ‘ग्रेज इन’ मध्ये डॉ. आंबेडकरांच्या चित्राच्या अनावरणप्रसंगी मला खूप आनंद होत आहे. यावेळी बाबासाहेबांचे पणतू सुजात आंबेडकर यांना सांगितले की, 21व्या शतकात त्यांनी भारताला जातीपातीच्या विळख्यातून बाहेर काढण्यास प्रयत्न करावेत.

लंडनमधील ‘ग्रेज इन’ ही तीच जागा आहे जिथे बाबासाहेब आंबेडकर यांनी आपली बॅरिस्टर ही पदवी मिळवली. त्यामुळेच ‘ग्रेज इन’मध्ये बाबासाहेब आबेंडकर यांचा छायाचित्र लावलं जाणं ही त्यांच्या अनुयायांसह संपूर्ण महाराष्ट्रासाठी आनंदाची बाब आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ऑक्टोबर 1916 साली लंडनमधील ग्रेज इनमध्ये बॅरिस्टरच्या कोर्ससाठी प्रवेश घेतला होता. सोबतच त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समध्ये देखील प्रवेश घेतला होता. जिथे त्यांनी अर्थशास्त्राच्या डॉक्टरेट थीसिसवर काम करणं सुरु केलं होतं आणि जो त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण देखील केला होता. त्यामुळेच त्यांना डॉक्टरेट ही पदवी देखील बहाल करण्यात आली होती.

या सगळ्या उच्च शिक्षणाच्या जोरावरच बाबासाहेबांनी भारतात परत येऊन एक मोठी क्रांती घडवली. देशाची राज्यघटना तयार करताना बाबासाहेबांनी आपलं सर्व कौशल्य पणाला लावलं आणि भारताचं संविधान घडवलं.

    follow whatsapp