पुण्यातल्या सावित्रीबाई फुले विद्यापीठात गणपती अथर्वशीर्ष कोर्सला मान्यता मिळाली आहे. हा कोर्स श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या पुढाकाराने हा कोर्स होतो आहे. या कोर्सला विरोध सुरू झाला आहे. प्राध्यापक हरि नरकेंनी या कोर्सला कडाडून विरोध केला आहे.
ADVERTISEMENT
प्राध्यापक हरि नरके यांनी काय म्हटलं आहे?
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने अथर्वशीर्ष अभ्यासक्रम सुरू करणे हा उलट्या पावलांचा प्रवास आहे. पुन्हा एकदा पेशवाईची स्वप्नं ही सनातनी मंडळी रंगवत असून त्यासाठी विद्यापीठे वेठिला धरली जात आहेत. हे धोकादायक पाऊल आहे. संस्कृतमध्ये अनेक सुंदर आणि मौलिक ग्रंथ आहेत ते शिकवण्याऐवजी अभ्यासकांच्या मते अगदी अलीकडील असलेले अथर्वशीर्ष संस्कृतची गोडी लावणे, मन:शांती व व्यक्तीमत्व विकासासाठी विद्यापीठाने अभ्यासक्रमाला लावणे कितपत योग्य?
माझा अथर्वशीर्षाला विरोध नाही असंही हरि नरकेंनी म्हटलं आहे
एखाद्या खासगी संस्थेने काय करावे हा मुद्दा वेगळा आहे. माझा गणेश अथर्वशिर्षाला विरोध नाही. शासकीय अनुदानावर चालणाऱ्या विद्यापीठाने संविधानाच्या कलम ५१ चे पालन करण्याऐवजी असे एका धर्माचे लेखन विद्यापीठातर्फे शिकवणे,विद्यापीठाच्या सही शिक्क्याचे प्रमाणपत्र देणे हा निर्णय चुकीचा आहे. राज्यात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा लागू आहे. पुण्याला आणि महाराष्ट्राला बुद्धिवाद, विज्ञाननिष्ठा आणि सामाजिक प्रबोधन यांचा मोठा वारसा आहे.याच न्यायाने उद्या पुढचे पाऊल म्हणून आधुनिक विज्ञानाचे अभ्यासक्रम बंद केले जातील. हे सारे भयंकर आहे.
काय आहे हा कोर्स?
सावित्राबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मान्यतेने आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या पुढाकाराने हा कोर्स होत आहे. कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला हा कोर्स करता येणार असून विशेषत: विद्यार्थ्यांना या कोर्स पूर्ण केल्यानंतर एक श्रेयांक मिळणार आहे.
ADVERTISEMENT