Ganesh Chaturthi Recipe: बाप्पाला आवडणारे उकडीचे मोदक कसे करायचे माहित आहे का?

Ganesh Chaturthi- गणपती बाप्पाचं मखर, सजावट आणि फुलांची आरास यांची तयारी घरोघरी केली जाते आहे. कारण गणपती बाप्पाच्या आगमानला आता अवघे काही तास उरले आहेत. अशात बाप्पाला आवडणाऱ्या नैवैद्याचाही विचार तुम्ही करत असालच. उकडीचे मोदक हा गणपतीला आवडणारा नैवैद्य आहे. आम्ही या बातमीत तुम्हाला सांगणार आहोत हे मोदक कसे करायचे याची कृती. उकडीचे मोदक तयार […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 02:30 AM • 31 Aug 2022

follow google news

Ganesh Chaturthi- गणपती बाप्पाचं मखर, सजावट आणि फुलांची आरास यांची तयारी घरोघरी केली जाते आहे. कारण गणपती बाप्पाच्या आगमानला आता अवघे काही तास उरले आहेत. अशात बाप्पाला आवडणाऱ्या नैवैद्याचाही विचार तुम्ही करत असालच. उकडीचे मोदक हा गणपतीला आवडणारा नैवैद्य आहे. आम्ही या बातमीत तुम्हाला सांगणार आहोत हे मोदक कसे करायचे याची कृती.

हे वाचलं का?

उकडीचे मोदक तयार करण्यासाठी लागणारं साहित्य

एक वाटी तांदुळाचं पीठ, हे पीठ सुगंधी असेल तर अति उत्तम

एक वाटी साखर किंवा गूळ (आवडीप्रमाणे)

खोवलेला नारळ-एक वाटी

साजूक तूप- दोन ते तीन चमचे

वेलची पूड

भाजून कुटलेली खसखस

उकडीच्या मोदाकाचं सारण कसं तयार कराल?

मोदकासाठी सारण तयार करताना खोवलेल्या नारळात एक वाटी गूळ किंवा साखर घालून ते मंद आचेवर शिजत ठेवावं. सारण शिजत असताना ते मधून मधून हलवत रहावं म्हणजे ते कढईला लागणार नाही. सारण शिजत आल्यानंतर त्यात वेलची पूड आणि खसखस पूड घालावी. त्यानंतर मिश्रण थोडं पुन्हा शिजवावं.

उकडीच्या मोदकासाठी उकड कशी तयार केली आहे?

तांदळाच्या पिठीप्रमाणे पाणी उकळून घ्यावं, त्यानंतर पाण्यात अगदी चवीपुरतं मीठ, दोन चमचे तूप आणि अर्धा चमचा तेल घालावं. पाणी उकळल्यानंतर पिठी घालून ते हलवावं. झाकण ठेवून मंद गॅसवर ठेवून दोन वाफा घ्याव्यात. उकड गरम असताना भांड्याच्या मदतीने मळून घ्यावी. हाताने मळण्याइतपत झाल्यानंतर तेल किंवा पाण्याचा हात लावत मोदक वळता येतील इतपत मऊ ठेवावं.

उकडीचे मोदक कसे तयार करावे?

उकडीचे लहान गोळे तयार करून त्याची पारी बनवून घ्यावी. वाटीचा आकार देऊन त्यात सारण भरावं. त्यानंतर पारीच्या कडा थोड्या थोड्या अंतराने दाबून बंद कराव्या आणि वर टोक ठेवावं म्हणजे मोदक तयार होईल. मोदक तयार करताना त्याच्या कळ्या तीन, पाच, सात किंवा नऊ अशा ठेवा म्हणजे मोदक दिसायलाही सुंदर दिसेल. तयार केलेले मोदक केळीच्या पानावर थोडं तूप लावून उकडायला ठेवावेत. मोदक गरम असतान त्यावर साजूक तूप घालून खायला घ्यावे.

३१ ऑगस्टला म्हणजेच बुधवारी गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे. कोरोना काळानंतर पहिल्यांदाच म्हणजेच दोन वर्षांनी सण आणि उत्सव धूम धडाक्यात साजरे केले जात आहेत. आपल्या लाडक्या बाप्पाचं स्वागत करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

    follow whatsapp