Garib Rath Express मध्ये बॉम्ब ठेवल्याचा फोन, अन्…

मुंबई तक

• 05:47 AM • 21 Feb 2023

नवी दिल्लीहून चेन्नईला जाणाऱ्या गरीब रथ एक्सप्रेसमध्ये बॉम्ब असल्याची माहिती मिळताच एकच खळबळ उडाली. गरीब रथ एक्सप्रेसच्या कोच जी-2 मध्ये एका प्रवाशाने रेल्वे पोलिसांना फोन करून याबाबत माहिती दिली. राजस्थानच्या धौलपूर रेल्वे स्थानकावर रेल्वे थांबवण्यात आली. सूचना मिळताच सर्व उच्च अधिकारी याठिकाणी पोहोचले. स्थानिक प्रशासन आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी मिळून शोध मोहीम सुरू केली. डॉग स्क्वॉड […]

Mumbaitak
follow google news

हे वाचलं का?

नवी दिल्लीहून चेन्नईला जाणाऱ्या गरीब रथ एक्सप्रेसमध्ये बॉम्ब असल्याची माहिती मिळताच एकच खळबळ उडाली.

गरीब रथ एक्सप्रेसच्या कोच जी-2 मध्ये एका प्रवाशाने रेल्वे पोलिसांना फोन करून याबाबत माहिती दिली.

राजस्थानच्या धौलपूर रेल्वे स्थानकावर रेल्वे थांबवण्यात आली. सूचना मिळताच सर्व उच्च अधिकारी याठिकाणी पोहोचले.

स्थानिक प्रशासन आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी मिळून शोध मोहीम सुरू केली. डॉग स्क्वॉड आणि बॉम्ब निकामी पथकही बोलावण्यात आलं.

यावेळी रेल्वेत बॉम्बची अफवा पसरवणाऱ्या एका आरोपीला त्याच्या 3 साथीदारांसह पोलिसांनी ताब्यात घेतलं.

तीन तासांच्या चौकशीनंतर, रेल्वे रवाना झाली. यामुळे प्रवाशांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागला.

अशाच वेबस्टोरीजसाठी क्लिक करा

    follow whatsapp